धक्कादायक प्रकार : नांदेड आगारामध्ये महिला अधिकारी व महिला वाहकामध्ये तू तू- मै मै 

प्रल्हाद कांबळे
Monday, 8 February 2021

सकाळी दहा वाजता सुरु झालेला हा प्रकार तब्बल दोन तासानंतर थांबला. निमित्त होते लांब पल्ल्याच्या गाडीवर महिला वाहकाला मुद्दाम पाठविण्याचे. 

नांदेड : येथील मध्यवर्ती बसस्थानकाला लागूनच असलेल्या आगारामध्ये सोमवार (ता. आठ) महिला सहाय्यक वाहतूक अधिकाऱ्याने महिला वाहकास सोबत घातलेला वाद चांगलाच चव्हाट्यावर आला. हा प्रकार अनेकांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिल्याने चांगलीच चर्चा सुरु झाली. सकाळी दहा वाजता सुरु झालेला हा प्रकार तब्बल दोन तासानंतर थांबला. निमित्त होते लांब पल्ल्याच्या गाडीवर महिला वाहकाला मुद्दाम पाठविण्याचे. 

एसटी विभागांमध्ये महिला वाहकांना संधी दिल्यानंतर अनेक महिला बसवाहक झाल्या. शासनाच्या नियमावलीप्रमाणे कोणतीही महिला वाहक असेल तर तिला अशा प्रकारची ड्युटी देणे बंधनकारक आहे, ज्याद्वारे ती आपल्या डेपोमध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत पुन्हा पोहोचेल. त्यामुळे महिलांच्या संदर्भाने शासनाने केलेले नियम आणि महिला विषयी असलेले धोरण योग्य राबवले जाईल, आणि अंधार पडल्यानंतर त्या आपापल्या घरी लवकर पोहोचतील असा त्यामागील मूळ उद्देश आहे. हा उद्देश फक्त एसटी विभागासाठी नसून पोलिस विभाग वगळता इतर सर्व विभागांना सुद्धा लागू आहे. पोलीस विभागात सुद्धा पोलिस ठाण्यात काम करणाऱ्या काही महिलांना रात्रीची ड्युटी लावली जाते. रात्री ड्युटीमध्ये पोलिस विभागातील कोठडीत असलेले आरोपी महिला सांभाळण्यासाठी त्यांची ड्युटी रात्री लावली जाते पण त्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही ठिकाणी महिला पोलिसांची ड्युटी रात्रीला लावली जात नाही.

शासनाच्या नियमावलीला कचऱ्यात टोपलीत

परंतु शासनाच्या नियमावलीला कचऱ्यात टोपलीत ठेवून नांदेड आगारातील सोमवारी (ता. आठ) घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. सोमवारी सकाळी ११ हा वाजता नांदेड येथून बीडला जाणाऱ्या बसमध्ये वाहक या कामासाठी महिला सहाय्यक वाहतूक अधिकारी यांनी एका महिला वाहकाला आदेश दिला. नांदेड येथून बीडला जाणारी बस रात्री दोन वाजता अर्थात मंगळवारी (ता. नऊ) पहाटे दोन वाजता पुन्हा नांदेडला येते. त्यावर महिला वाहकाने आक्षेप घेत मी सायंकाळी सहा वाजता परत येऊ शकणार नाही. त्यासाठी मला फक्त परळी वैजनाथपर्यंत ड्युटी द्यावी अशी विनंती केली. यावर महिला सहाय्यक वाहतूक अधिकारी चांगल्याच भडकल्या. त्यांनी चक्क तुम्हाला निमंत्रण दिले होते काय? एसटीमध्ये वाहक होण्यासाठी असे शब्द वापरुन महिला वाहकाला खालच्या दर्जाची वागणूक दिली. 

महिला वाहकांसह वरिष्ठ पुरुष वाहकांनाही त्रास

नांदेड आगारमध्ये जवळपास 54 महिला वाहक आहेत. हा गोंधळ सुरु झाला तेव्हा हळूहळू या ठिकाणी एसटी चालक, वाहक आणि बसस्थानकातील प्रवाशांची गर्दी जमू लागली. या प्रकरणी आगारप्रमुख पुरुषोत्तम व्यवहारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shocking type: In Nanded depot, in the female officer and in the female carrier nanded news