Nanded : भावकीच्या लोकांनी मारण्याची धमकी दिली; व्हिडीओ करुन तरुणाने संपवले जीवन

Nanded : नायगाव तालुक्यातील श्याम यशवंत जाधवने भावकीच्या लोकांच्या धमकीमुळे आत्महत्या केली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली असून पोलीस तपास सुरू आहे.
Nanded
Nandedsakal
Updated on

नायगाव : किरकोळ कारणावरून भावकीच्या लोकांनी शिविगाळ करुन मारण्याची धमकी दिली. त्यामुळे नायगाव तालुक्यातील निळेगव्हाण येथील श्याम यशवंत जाधव या २० वर्षीय तरुणाने व्हिडीओ तयार करुन आणि धमकी देणाऱ्यांचे नावे घेवून कुष्णूर येथील तलावात उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. घटनास्थळी कुंटूर पोलीस पोहचले असून मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.

नायगाव तालुक्यातील निळेगव्हाण येथील तरुण श्याम यशवंत जाधव यांच्या गाडीचा अपघात झाला होता. यात माझ्या गाडीचे मोठे नुकसान झाले असून नुकसान भरपाई म्हणून भावकीच्या माणसांनी १ लाखाची मागणी केली होती. जाधव यांची परिस्थिती नसल्याने श्याम जाधवच्या वडीलांनी ५० हजार देण्याचे आश्वासन दिले.

वादावादी घटनेत तरुणाच्या आईला भोवळ आल्याने ती जमीनीवर कोसळली. त्यामुळे घरातील मंडळी रुग्णालयात गेली होती तर श्याम हा घरीच होता. ही संधी साधून भावकीची मंडळी घरी आली आणि पुन्हा धमकी देवून गेले. यापूर्वी श्याम जाधव याला मारहाण करण्यात आली होती त्यामुळे आपल्याला मारहाण सहन होत नाही त्यामुळे त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

सर्व घटनेचा सविस्तर व्हिडीओ तयार केला आणि या व्हिडीओत मारहाण करणाऱ्या़ची नावे घेतली आणि तो व्हिडीओ आपल्या स्टेटस ला ठेवून तो दि. १४ रोजी दुपारी घरातून बाहेर पडला. घरची मंडळी परत आल्यानंतर श्याम घरी नसल्याचे दिसून आले त्यामुळे शोधाशोध केली पण संपर्क झाला नाही सायंकाळी कुंटूर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. कुंटूर पोलिसांनी शोध घ्या असे सांगून आपली जबाबदार पुर्ण केली. रात्रभर शोध घेतल्यानंतर कुष्णूर येथील तलावाच्या बाजूला श्याम जाधव याचा मोबाईल सापडला.

त्यांनतर नातेवाईकांनी शोध घेतला असता श्याम जाधव याचा मृतदेह (ता.१५) रोजी सकाळी तलावात आढळून आला. घटनेची माहिती कुंटूर पोलिसांना देण्यात आली त्यानंतर पोलिस घटनास्थळी आले. मृतदेह बाहेर काढण्यात आला असून उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com