Nanded News : देगलूर आगाराला सहा नवीन एस.टी. बस; कर्मचारी अपुऱ्यामुळे प्रवाशांचे हाल
Degloor News : देगलूर आगारासाठी नवीन सहा एस.टी बस उपलब्ध झाल्या असल्या तरीही कर्मचारी अपुरेपणामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. सध्या ११६ चालक-वाहक असून, प्रवाशांच्या संख्येनुसार किमान १५० कर्मचारी आवश्यक आहेत.
देगलूर : देगलूर आगारासाठी एस.टी महामंडळाने नवीन सहा एसटी बस उपलब्ध करून दिल्या आहेत. दैनंदिन १६ हजार प्रवासी संख्या असलेल्या या आगारात सध्यस्थितीत ११६ वाहक-चालक कार्यरत आहेत. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता १५० चालक-वाहक असणे गरजेचे आहे.