नांदेड विभागातून सहा नवीन रेल्वे एप्रिलमध्ये सुरु होणार

File photo
File photo

नांदेड ः  एप्रिल महिन्यात नांदेड रेल्वे विभागातून सहा गाड्या सुरु करण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वे घेतला आहे. या सर्व रेल्वे आरक्षित असून, अनारक्षित प्रवाशांना प्रवास करता येणार नसल्याचे रेल्वेच्या जनसंपर्क विभागाच्या वतीने कळवीले आहे. 

रेल्वे संख्या ०२७५३ नांदेड ते निझामुद्दीन (साप्ताहिक) विशेष एक्स्प्रेस सहा एप्रिलपासून दर मंगळवारी सकाळी नऊ वाजता सुटून औरंगाबाद, मनमाड, भोपाल, झांसी, आग्रा मार्गे निझामुद्दीन येथे दुसऱ्या दिवशी पोचेल. तसेच ०२७५४  निझामुद्दीन ते नांदेड (साप्ताहिक) विशेष एक्स्प्रेस सात एप्रिलपासून दर बुधवारी निझामुद्दीन येथून रात्री २२.४० वाजता सुटून आग्रा, झांसी, भोपाल, मनमाड, औरंगाबाद मार्गे नांदेड येथे पोचेल. 

रेल्वे संख्या ०७४०९ आदिलाबाद ते नांदेड विशेष एक्स्प्रेस एक एप्रिलपासून आदिलाबाद येथून सकाळी वजता सुटून किनवट, हिमायतनगर, भोकर, मुदखेड मार्गे नांदेड येथे पोचेल. तसेच रेल्वे संख्या ०७४१० नांदेड ते आदिलाबाद विशेष एक्स्प्रेस  एक एप्रिलपासून नांदेड येथून दुपारी १५.०५ वाजता सुटून भोकर, हिमायतनगर, किनवट मार्गे आदिलाबाद येथे पोचेल. रेल्वे संख्या ०७६१९ नांदेड ते औरंगाबाद विशेष साप्ताहिक एक्सप्रेस दोन एप्रिलपासून दर शुक्रवारी नांदेड येथून सकाळी ११.५० वाजता तर ०७६२० औरंगाबाद ते नांदेड दर सोमवारी पाच एप्रिलपासून सुरु होत आहे. 

याशिवाय रेल्वे संख्या ०७६२१ औरंगाबाद ते रेनीगुंटा विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस दर शुक्रवारी दोन एप्रिलपासून औरंगाबाद येथून रात्री २०.५० वाजता सुटून परभणी, विकाराबाद, रायचूर, गुंटकळ मार्गे रेनीगुंटा येथे पोचेल. तसेच ०७६२२ रेनीगुंटा ते औरंगाबाद ही रेल्वे दर शनिवारी तीन एप्रिलपासून रेनीगुंटा येथून रात्री २१.२५ वाजता सुटणार आहे. रेल्वे संख्या ०२७६७ नांदेड ते सत्रागच्ची विशेष साप्ताहिक एक्सप्रेस दर सोमवारी पाच एप्रिलपासून नांदेड येथून दुपारी १५.२५ वाजता सुटून किनवट, नागपूर, रायपुर, बिलासपुर, चक्रधरपूर, खरगपूर मार्गे सत्रागच्ची (कोलकत्ता) येथे दुसऱ्या दिवशी पोचेल.  तर ०२७६८ सत्रागच्ची ते नांदेड दर बुधवारी सात एप्रिलपासून सत्रागच्ची येथून दुपारी १४.४५ वाजता सुटणार आहे. 

रेल्वे संख्या ०७६२३ नांदेड ते श्री गंगानगर विशेष साप्ताहिक एक्सप्रेस दर गुरुवारी एक एप्रिलपासून नांदेड येथून सकाळी ६.५० वाजता सुटून पुर्णा, बसमत, हिंगोली, वाशीम, अकोला, शेगाव, सुरत, वडोदरा, अहेमदाबाद, अबुरोड, जोधपुर, बिकानेर  मार्गे श्री गंगानगर येथे दुसऱ्या दिवशी पोचेल. तर ०७६२४ श्री गंगानगर ते नांदेड ही रेल्वे दर शनिवारी तीन एप्रिलपासून श्री गंगानगर येथून दुपारी १२.३० वाजता सुटणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com