स्लोमोशनमुळे मोठा अपघात टळला, सचखंडचे तीन डब्बे निसटले

file photo
file photo

नांदेड : लॉकडाउनच्या काळात नांदेड दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातून सचखंड एक्सप्रेस ही अमृतसर मागील काही दिवसांपासून नियमीत धावते. दिल्ली, अमृतसर, पंजाब राज्यातून मोठे शिख भाविक सचखंड गुरुद्वाराचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. मात्र बुधवारी (ता. १४) सकाळी अमृतसरकडे निघालेली सचखंड एक्सप्रेसला अपघात झाला. यात कुठलीही जिवीत हानी झाली नाही. गाडी स्लोमोशनमध्ये असल्याने स्थानकाच्या बाहेर पडताच मागचे तीन डब्बे क्लिपच्या बिघाडीमुळे निसटले. जवळपास सुटलेले डब्बे सोडून रेल्वे शंभर मिटर अंतरावर जावून थांबली. 

दक्षिण मध्ये रेल्वेच्या नांदेड विभागात रेल्वे गाड्यांना नेहमीच अपघात होत असतात. कधी इंजीन बिघाड तर कधी रेल्वे रुळावरुन गाडी घसरणे हे नित्याचेच प्रकार आहेत. या विभागात तेलंगना व आंध्रधार्जीने अधिकारी असल्याने त्यांना मराठवाड्यातील प्रवाशांच्‍या सुरक्षीत प्रवासाबद्दल काही देणे घेणे नसल्याचे अनेक उदाहरणे पहावयास मिळतात. मराठवाडा विभागात धावणाऱ्या रेल्वे गाड्यांचे डब्बे जुने व खराब अवस्थेत असतात. रेल्वे डब्यात कुठलीच सुरक्षितता नसते. लॉकडाऊनमध्ये ह्या गाड्या मागील सहा महिण्यापासून बंद अवस्थेत आहेत. जेमतेम तीन गाड्या सुरु झाल्या. त्यातच आजचा हा रेल्वे यांत्रीकी विभागाचा गलथान कारभार समोर आला. 

खडकपूरा पीट लाईनजवळ सदर रेल्वेचे तीन डब्बे अनकपलींग

सचखंड एक्सप्रेस ही नांदेडहून अमृतसरकडे बुधवारी (ता. १४) सकाळी साडेनऊ वाजता निघाली. हजूर साहेब रेल्वेस्थानकातून गाडी स्लोमोशनमध्ये निघताच काही अंतरावर खडकपूरा पीट लाईनजवळ सदर रेल्वेचे तीन डब्बे अनकपलींग झाल्याने मागेच राहिले. गाडी जवळपास शंभर मीटर पुढे गेल्यानंतर गार्डच्या सावधानेतेने चालकास कळाले. त्यानंतर गाडी थंबविण्यात आली. प्रवाशआंची चांगलीच धांदल उडाली. घटनास्थळी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिस पोहचले असून कपलींगमध्ये दुरुस्ती करून तब्बल एक तासांनी सचखंड पुढे सोडण्यात आल्याचे जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे यांनी कळविले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com