

नांदेड : सोशल मीडियावर समाजात तेढ निर्माण करणाऱ्या आणि कायदा-सुव्यवस्थेला धोका पोहोचवणाऱ्या पोस्ट प्रकरणी नांदेड जिल्ह्यात नऊ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत जिल्हा पोलिस दलाने कठोर पावले उचलत सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलची स्थापना केली असून, समाजविघातक पोस्ट करणाऱ्यांवर करडी नजर ठेवली जात आहे.