

Tuljapur Set to Join Railway Network with Solapur–Dharashiv Line
Sakal
तुळजापूर: सोलापूर तुळजापूर धाराशिव या महत्त्वाकांक्षी रेल्वेमार्गाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. सुमारे ८५ किलोमीटर लांबीचा हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर तुळजाभवानी मंदिर हे राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र थेट रेल्वे नकाशावर येणार आहे. गेल्या पाच दशकांपासून या मार्गासाठी पाठपुरावा होत असून, स्थानिक लोकप्रतिनिधींनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.