
नांदेड : पहाटे साडेचारला उठून वडिलांसोबत वृत्तपत्र वाटण्याचे काम करत करत अभ्यास करणाऱ्या यश बालाजी चंदेल या विद्यार्थ्याने दहावीच्या परीक्षेत ९६.२० टक्के गुण मिळवत नांदेड जिल्ह्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांना अभिमान वाटावा असे यश मिळवले. यशच्या या प्रेरणादायी कामगिरीचा गौरव करत राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे त्याचा सत्कार वृत्तपत्र वितरण सेंटरवर करण्यात आला.