esakal | दक्षिण मध्य रेल्वेच्या एप्रिल महिन्यात नांदेड विभागातून सहा गाड्या धावणार

बोलून बातमी शोधा

file photo}

यामुळे रेल्वेप्रवाशांना देशातील विविध भागात जाण्याची संधी मिळणार आहे.  

दक्षिण मध्य रेल्वेच्या एप्रिल महिन्यात नांदेड विभागातून सहा गाड्या धावणार
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : रेल्वे बोर्डाने घोषित केल्यानुसार नांदेड येथून विविध भागात जाण्याकरिता एप्रिल महिन्यात सहा नवीन विशेष रेल्वे सुरु होणार असल्याचे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने प्रसिध्दीपत्राद्वारे कळविले आहे. यामुळे रेल्वेप्रवाशांना देशातील विविध भागात जाण्याची संधी मिळणार आहे.  

गाडी संख्या 02753 नांदेड ते निझामुद्दीन (साप्ताहिक) विशेष एक्सप्रेस दर मंगळवारी : 

ही गाडी ता. सहा एप्रिलपासून नांदेड येथून दर मंगळवारी सकाळी नऊ वाजता सुटेल आणि औरंगाबाद, मनमाड, भोपाल, झांसी, आग्रा मार्गे निझामुद्दीन येथे दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता पोचेल. 

गाडी संख्या 02754 निझामुद्दीन ते नांदेड (साप्ताहिक) विशेष एक्सप्रेस दर बुधवारी :

ही गाडी ता. सात एप्रिलपासून निझामुद्दीन येथून दर बुधवारी रात्री १०. ४० वाजता आग्रा, झांसी, भोपाल, मनमाड, औरंगाबाद मार्गे नांदेड येथे रात्री ००.३५ वाजता पोचेल. 

गाडी संख्या 07409 आदिलाबाद ते नांदेड विशेष एक्सप्रेस :

ही गाडी ता. एक एप्रिलपासून आदिलाबाद येथून सकाळी आठ वाजता सुटेल आणि किनवट, हिमायतनगर, भोकर, मुदखेड मार्गे नांदेड येथे ११. ५५ वाजता पोचेल. 

गाडी संख्या 07410  नांदेड ते आदिलाबाद विशेष एक्सप्रेस :

ही गाडी ता. एक एप्रिलपासून नांदेड येथून दुपारी १५. ०३ वाजता सुटेल आणि भोकर, हिमायतनगर, किनवट मार्गे आदिलाबाद येथे सायंकाळी १८. ५५ वाजता पोचेल. 
गाडी संख्या 07619  नांदेड ते औरंगाबाद  विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस (दर शुक्रवारी) : 

ही गाडी ता. दोन एप्रिलपासून नांदेड येथून सकाळी ११. ५० वाजता सुटेल आणि परभणी मार्गे औरंगाबाद येथे सायंकाळी १६. ५० वाजता पोचेल. 

गाडी संख्या 07620  औरंगाबाद ते नांदेड विशेष साप्ताहिक एक्सप्रेस (दर सोमवारी ) :

ही गाडी ता. पाच एप्रिलपासून नांदेड येथून रात्री एक वाजून पाच मिनीटाला सुटेल आणि परभणी मार्गे नांदेड  येथे सकाळी सव्वासहा  वाजता पोचेल.
 
गाडी संख्या 07621 औरंगाबाद ते रेनीगुंटा विशेष साप्ताहिक एक्सप्रेस (दर शुक्रवारी) :  

ही गाडी ता. दोन एप्रिलपासून औरंगाबाद येथून रात्री २०. ५० वाजता सुटेल आणि परभणी, विकाराबाद, रायचूर, गुंटकळ मार्गे रेनीगुंटा येथे सायंकाळी सात वाजता पोचेल. 


गाडी संख्या 07622  रेनीगुंटा ते औरंगाबाद  विशेष साप्ताहिक एक्सप्रेस (दर शनिवारी) :   

ही गाडी ता. तीन एप्रिलपासून रेनीगुंटा येथून रात्री २१. २५ वाजता सुटेल आणि गुंटकळ, रेचुर, विकाराबाद, परभणी मार्गे औरंगाबाद येथे रात्री  २२. १५  वाजता पोहोचेल.

गाडी संख्या 02767 नांदेड ते सत्रागच्ची विशेष साप्ताहिक एक्सप्रेस (दर सोमवारी) : 

ही गाडीता. पाच एप्रिलपासून नांदेड येथून दुपारी १५. २५ वाजता सुटेल आणि किनवट, नागपूर, रायपुर, बिलासपुर, चक्रधरपूर, खरगपूर मार्गे सत्रागच्ची (कोलकत्ता) येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी १९. २० वाजता पोचेल.
    
गाडी संख्या 02768  सत्रागच्ची ते नांदेड विशेष साप्ताहिक एक्सप्रेस (दर बुधवारी) : 

ही गाडी ता. सात एप्रिलपासून सत्रागच्ची (कोलकत्ता) येथून दुपारी पावणेतीन वाजता सुटेल आणि खरगपूर, चक्रधरपूर, बिलासपुर, रायपुर, नागपूर, किनवट मार्गे नांदेड येथे दुसऱ्या दिवशी नांदेड येथे सायंकाळी १९. १० वाजता पोचेल.
 
गाडी संख्या 07623 नांदेड ते श्री गंगानगर विशेष साप्ताहिक एक्सप्रेस (दर गुरुवार) :   

ही गाडी ता. एक एप्रिलपासून नांदेड येथून सकाळी ६. ५० वाजता सुटेल आणि बसमत हिंगोली, वाशीम, अकोला , शेगाव, सुरत, वडोदरा, अहेमदाबाद, अबुरोड, जोधपुर, बिकानेर मार्गे श्री गंगानगर येथे दुसऱ्या दिवशी रात्री १९. २० वाजता पोहोचेल. 

गाडी संख्या 07624 श्री गंगानगर ते नांदेड विशेष साप्ताहिक एक्सप्रेस (दर शनिवारी) :  

ही गाडी ता. तीन एप्रिलपासून श्री गंगानगर येथून दुपारी १२. ३० वाजता सुटेल आणि बिकानेर जोधपुर, अबुरोड, अहेमदाबाद, वडोदरा, सुरत, शेगाव, अकोला,  वाशीम, हिंगोली, बसमत मार्गे नांदेड येथे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी रात्री अडीच वाजता पोचेल.