esakal | सचखंड गुरुद्वारा बोर्डातर्फे शीख समाजांतर्गत कोविड रुग्णांसाठी विशेष मदत सेवाकेंद्र

बोलून बातमी शोधा

सचखंड गुरुद्वारा
सचखंड गुरुद्वारा बोर्डातर्फे शीख समाजांतर्गत कोविड रुग्णांसाठी विशेष मदत सेवाकेंद्र
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : शीख समाजात कोविड कोरोना संक्रमण पसरत असल्यामुळे गरीब व सामान्य कुटुंबापुढे उद्भवलेल्या अडचणीवर मार्गदर्शन देण्यासाठी व मदत करण्यासाठी गुरुद्वारा सचखंड बोर्ड नांदेड संस्थेतर्फे महाराजा रणजीतसिंघजी यात्री निवास परिसरात विशेष मार्गदर्शन केंद्र बुधवार (ता. २१) सकाळी नऊ वाजता सुरु करण्यात आले आहे. अशी माहिती गुरुद्वारा बोर्डाचे वरिष्ठ सहायक अधीक्षक स. शरणसिंघ सोढी यांनी दिली.

नांदेडमध्ये कोरोनाचे संक्रमण झपाट्याने पसरत आहे. शीख समाजात देखील मृत्यूंचे प्रमाण वाढलेले आहेत. तसेच आर्थिक दृष्ट्या कमकुवत आणि गरीब लोकांची होत असलेली हेलसांड थंबविण्याच्या उद्देश्याने गुरुद्वारा बोर्डाने पुढाकार घेतला आहे. गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष स. भूपिंदरसिंघ मनहास यांनी बोर्डाचे उपाध्यक्ष स. गुरिन्दरसिंघ बावा, सचिव स. रविंदर सिंघ बुंगाई, समन्वयक स. परमज्योतसिंघ चाहल, सदस्य भाई गोबिंदसिंघ लोंगोवाल, स. मनप्रीतसिंघ कुंजीवाले, स. गुरमीतसिंघ महाजन, स. रघुवीरसिंघ विर्क, व्यवस्थापन समिति सदस्य स. गुलाबसिंघ कंधारवाले, स. नौनिहालसिंघ जहागीरदार, स. देविंदरसिंघ मोटरावाले, अधीक्षक स. गुरविंदरसिंघ वाधवा, सहायक अधीक्षक स. शरणसिंघ सोढी यांच्या सहकार्याने महाराजा रणजीत सिंघजी यात्रिनिवास येथे विशेष कोविड सेवा मार्गदर्शन केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला.

बुधवारी (ता. २१) सकाळी नऊ वाजता पासून रात्री नऊवाजेपर्यंत, बारा तास हा सेवा केंद्र सुरु राहणार आहे. येथे कोरोना टेस्ट, सिटी स्कॅन, कोरोना उपचार औषधी, बेडची उपलब्धता इत्यादी विषयी मार्गदर्शन व मदत उपलब्ध राहील. समाजातील गरीब व गरजूसाठी निः शुल्क सिटी स्कॅन सेवा देखील बोर्डातर्फे देण्यात येणार आहे. तेव्हा शीख समाजातील रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन बोर्डातर्फे करण्यात आले आहे.