esakal | विशेष बातमी : जोखीम उचलत मोहफुलाच्या झाडापासुन रोजगाराचा आधार 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

शिवणी व परीसरातील मजुर व शेतकऱ्यांना मोहफुलापासुन मिळतो रोजगार. कोरोना संसर्गामुळे अनेकांचा रोजगार बुडाल्याने मोहफुलाच्या झाडापासून थोडा रोजगाराचा आधार मिळाला

विशेष बातमी : जोखीम उचलत मोहफुलाच्या झाडापासुन रोजगाराचा आधार 

sakal_logo
By
विठ्ठल लिंगपूजे

शिवणी ( जिल्हा नांदेड ) : किनवट तालुक्यातील शिवणी व परीसरात गेल्या वर्षभरापासून निसर्गाच्या अवकृपेने शेती पिकत नसल्याने व कोरोनामुळे रोंजनदारीवर जगणारे अनेक कुटुबांना रोजगार मिळत नव्हता. त्यामुळे शिवणी व परीसरात जंगल व वनसंपदा मोठ्याप्रमाणात असल्यामुळे परिसरात राहणारे मजुर व शेतकरी यांना या जंगलामुळे अनेक प्रकारचे फायदे व रोजगार मिळत असतो. जंगलातल्या अनेक झाडापासून रोजगार उपलब्ध होतो. मोहाचे झाड, चारोळी, टेंभर, बिडी पत्ता अशा अनेक प्रकारच्या झाडापासून दरवर्षी रोजगार मिळत असतो.

मोहफुलाच्या झाडाला एप्रील महीण्यात या झाडाला फुले येत असतात. हे फुले गोळा करण्यासाठी नागरीकांना अनेक संकटाशी सामनाही करावा लागतो. या मोहफुलाच्या झाडाची फुले खाली गळण्याची वेळ सकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान असते. त्यामुळे ही फुले गोळा करण्यासाठी नागरीकांना सकाळी तीन ते चार वाजेच्या दरम्यान उठून जंगलाचा रस्ता धरावा लागतो. या जंगलात अनेक प्रकारचे हींस्ञ प्राणी असून आपल्या जिवाची पर्वा न करता अंधा-या रात्री जंगलात जावे लागते. मोहफुले वेचण्यासाठी अनेक नागरीक व शेतकरी जंगलात मोहफुले वेचण्यासाठी जात असताना रात्रीला उरलेली भाकर व पाणी सोबत न्याव लागते. कारण मोहफुले गोळा करण्यासाठी रात्रीच्या वेळी पाच ते सहा किलो मिटरचा प्रवास करावा लागतो. या प्रवासा दरम्यान अनेक संकटाशी सामनाही करावा लागतो.

मोहफुलाच्या झाडाचा दुसरा फायदा

मोहफुलाच्या झाडाला मोहफुले गळने थांबले की या झाडाला चिकुच्या आकाराची फळे येण्यास सुरवात होते. ही फळे खाण्यासाठी गोड असतात. ही फळे पक्षासाठी मेजवाणीच असते. याफळामध्ये चिकुच्या फळासारखी बी असते. त्यापेक्षा या फळातील बी मोठ्या आकाराची असते. त्या बीला टोय असे म्हणतात. या टोईपासुन खाण्याचे तेल निघत असते. मोहफुलाच्या झाडाला ही फळे साधारण मे महिण्यात फळे पीकलेली असतात. त्यामुळे पिकलेली फळे खाली पडून किंवा पक्षी खालल्यामुळे या टोया झाडाखाली पडतात. ती टोय जमा करुन घरी आणून ही फळे टनक असल्यामुळे फोडावी लागतात. ती टोय फोडुन उन्हात सुकवुन टनक झाल्यावर वर्ष भर खाण्याठी लागणारे तेल संकलन करत असतात. त्यामुळे या मोहफुलाच्या झाडापासुन मजुराना व शेतकऱ्यांना दुहेरी फायदा मिळतो.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image