nanded gurudwara cm devendra fadnavis ashok chavan and atul save
sakal
नांदेड - ‘शीख समाजासाठीच नव्हे, तर देशाच्या संस्कृती, संस्कार, धर्म व मानवतेला वाचविण्यासाठी बलिदान देणाऱ्या श्री गुरू तेगबहादूर साहिबजी यांचा इतिहास येणाऱ्या पिढीला माहीत व्हावा, यासाठी महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचविण्यास सरकार कटिबद्ध आहे,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. येथील मोदी ग्राउंडवर आयोजित ‘हिंद दी चादर’ श्री गुरू तेगबहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमात रविवारी ते बोलत होते.