Nanded News : रेल्वेतील चोरीप्रकरणी गुन्हेगारांना पकडण्यासाठी पथके

वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त; नांदेड विभागाची आढावा बैठक
nanded
nandedsakal

नांदेड : रेल्वेमधील मालमत्तेच्या चोरीच्या घटना, प्रवाशांच्या सामानाची चोरी, दगडफेक आणि अनुचित घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गुन्हेगारांच्या टोळ्या पकडणे, प्रकरणे रोखण्यासाठी आणि शोधण्यासाठी पोलीस ठाणे स्तरावर सर्व ठाणे प्रभारींनी विशेष पथके तयार करावीत, अशा सूचना रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त अमित प्रकाश मिश्रा यांनी दिल्या.

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीती सरकार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. १२) जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासमवेत एक समन्वय बैठक पार पडली. त्यावेळी वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त मिश्रा बोलत होते. यावेळी अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेंद्रकुमार मीना, पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव यांच्यासह इतर अधिकारी, लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे अधिकारी सहभागी झाले होते.

nanded
Nanded News : नांदेडला पुनर्तपासणीत नोंद नाही

यावेळी जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील रेल्वे मालमत्तेच्या चोरीच्या घटना, प्रवाशांच्या सामानाची चोरी, दगडफेक आणि अनुचित घटना यासारख्या चिंतेच्या विविध विषयांचे सादरीकरण केले. रेल्वे पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस यांच्या समन्वयाने स्थानिक गुप्तचर माहितीची देवाणघेवाण आणि गुन्हेगारांविरुद्ध प्रभावी कायदेशीर कारवाई या प्रतिबंधात्मक उपायांभोवती चर्चा करण्यात आली.

nanded
Nanded News : पतीने मारहाण करून केला पत्नीचा खून

असुरक्षित भागात विशेष पाळत, गोपनीय नजर ठेवली जाते. केबल कटिंग, गुन्हेगारांच्या टोळ्या इत्यादी प्रकरणे रोखण्यासाठी आणि शोधण्यासाठी ठाणे स्तरावर सर्व ठाणे प्रभारींना विशेष पथके तयार करण्याच्या सूचना मिश्रा यांनी दिल्या. तसेच विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीती सरकार यांनी रेल्वेच्या जमिनीवरील अतिक्रमण आणि जमीन बळकावण्याच्या प्रयत्नांबद्दल चिंता व्यक्त केली. पोलीस अधीक्षक कोकाटे यांनी रेल्वेच्या पथकाला सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी दिले.

जनजागृती मोहिम राबविणार

पोलीस अधीक्षक कोकाटे यांनी बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायद्याच्या तरतुदींसह, विशेषत: बालवयीन मुलांशी संबंधित बाबी हाताळण्यासाठी अवलंबल्या जाणाऱ्या कार्यपद्धती स्पष्ट केल्या. गुन्हेगारी प्रकरणे कमी करण्यासाठी अल्पवयीन गुन्हेगारांच्या पुनर्वसनासाठी एनजीओच्या समन्वयाने आरपीएफ, जीआरपी आणि स्थानिक पोलिसांद्वारे संयुक्त जनजागृती मोहिम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com