esakal | शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्री सुरु; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उभारले तंबु : डाॅ. विपीन यांचा उपक्रम

बोलून बातमी शोधा

file photo}

नांदेड : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्री केंद्राची सुरवात शुक्रवारी करण्यात आली.

शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्री सुरु; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उभारले तंबु : डाॅ. विपीन यांचा उपक्रम
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे/ कृष्णा जोमेगावकर

नांदेड : विकेल ते पिकेल संकल्पनेतून संत सावता माळी रयत बाजार अभियानातंर्गत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शेतकरी ते ग्राहक थेट
शेतमाल विक्री केंद्राचा शुभारंभ शुक्रवारी (ता. ११) उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्या हस्ते झाला. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, कृषी उपसंचालक माधूरी सोनवणे, उपविभागीय कृषी अधिकारी माधव सोनटक्के, जिएसटीचे सहायक आयुक्त एकनाथराव पावडे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, नांदेड तालुका कृषी अधिकारी एस. बी. मोळके, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश थोरात, श्री सुपेकर, माविमचे चंदनसिंग राठोड, आत्माचे हरी बिरादार, सर्व तालुका तंत्र व्यवस्थापक उपस्थित होते. शेतकऱ्यांना शेतीमालाचा अधिक नफा मिळावा, यासाठी कृषी विभागाकडून विकेल ते पिकेल संकल्पना राबविण्यात येत आहे.

यातूनच संत सावता माळी रयत बाजार अभियानातंर्गत चार दिवशीय शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्री आयोजन जिल्हाधिकारी डाॅ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नुकतेच करण्यात आले होते. यावेळी प्रतिसाद मिळाल्यानंतर त्याच ठिकाणी वर्षभर ग्राहकांना दर्जेदार, विषमुक्त फळे, भाजीपाला, शेतमाल मिळावा, अशी मागणी पुढे आली होती. यानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पहिल्यांदा दर आठवड्यातील सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस थेट विक्री करण्यासाठी सहा स्टॉलची व्यवस्था केली आहे.

जिल्हाधिकारी परिसरात सोमवार ते शुक्रवार

यावेळी रविशंकर चलवदे यांनी जिल्हाधिकारी परिसरात सोमवार ते शुक्रवार या कालावधीत शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्री केंद्र सुरु राहणार आहे. शहरातील नागरिकांनी सेंद्रीय पद्धतीने पिकविलेला भाजीपाला, फळे, धान्य खरेदी करावे, असे आवाहन केले. दर्जेदार शेतमाल विक्री शुक्रवारी शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्री सुरु झाली. यात बारड येथील नवनाथ देशमुख यांचे खरबुज, विठ्ठल लष्करे यांचा सेंद्रीय भाजीपाला, सावरगाव येथील नवनाथ आबादार व वाई यथील चुंचलवाड यांचा सेंद्रीय शेवगा, विठोबा नैसर्गीक भाजीपाला व ओमशांती सेंद्रीय भाजीपाला स्टॉल, संजय घोगरे यांच्या डाळी, लहान येथील महिला बचत गटाच्या जात्यावरील तुरीची डाळ, अक्षय सर्जे यांचे केळीचे चिप्स व सफा बचत गटाकडून विविध प्रकारचा मसाला व पापड विक्रीसाठी उपलब्ध आहे.