स्वारातीम विद्यापीठात साकारतोय अत्याधुनिक मीडिया स्टुडिओ 

प्रल्हाद कांबळे
Thursday, 27 August 2020

कुलगुरू डॉ उद्धव भोसले यांच्या तात्काळ निर्णय घेण्याच्या व झटपट काम करण्याच्या कार्य पद्धतीने  मीडिया स्टुडिओचे काम अंतिम टप्प्यात आले असून अत्यंत अत्याधुनीक यंत्रणा असलेला हा स्टुडिओ लवकरच विद्यार्थी व व्यावसायिक कामासाठी खुला केला जाणार आहे. 

नांदेड : ज्ञानगंगा घरोघरी पोहचवण्याचा संकल्प सोडलेल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात माजी मुख्यमंत्री व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या दूर दृष्टीने तसेच कुलगुरू डॉ उद्धव भोसले यांच्या तात्काळ निर्णय घेण्याच्या व झटपट काम करण्याच्या कार्य पद्धतीने  मीडिया स्टुडिओचे काम अंतिम टप्प्यात आले असून अत्यंत अत्याधुनीक यंत्रणा असलेला हा स्टुडिओ लवकरच विद्यार्थी व व्यावसायिक कामासाठी खुला केला जाणार आहे. 

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात माध्यम शास्त्र संकुलाचे उद्धघाटन 2009-10 या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोकराव चव्हाण  यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्यांनी या संकुलात दिल्ली -मुंबई च्या पातळीवर अत्याधुनीक इलेक्ट्रॉनिक मीडिया स्टुडिओ उभारून त्याचा लाभ या भागातील विद्यार्थ्यांना व्हावा तसेच त्यातून व्यावसायिक कामे होऊन रोजगार निर्मिती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती.त्या नुसार माध्यम शास्त्र संकुलाचे संचालक डॉ. दीपक शिंदे यांनी नियोजन केले, निधी उपलब्ध करून घेण्यासाठी वेगवेगळ्या संस्था कडे प्रस्ताव पाठवले व सुमारे दोन करोड रुपये या कामाकरिता उपलब्ध करून घेतले त्यातुन या स्टुडिओ ची उभारणी करण्यात येत  आहे. 

हेही वाचा -  वाहनधारकांसाठी गुड न्यूज : सार्वजनिक वाहतूक आणि मालवाहतूकीला ३० सप्टेंबरपर्यंत करमाफी -

इलेक्ट्रॉनिक मीडिया हा अभ्यासक्रम

माध्यमासाठी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यां करिता काळाची गरज ओळखुन इलेक्ट्रॉनिक मीडिया हा अभ्यासक्रम या संकुलात सुरु करण्यात आला आहे, हा अभ्यासक्रम पूर्ण केलेले अनेक विद्यार्थी मुंबई, पुणे व महाराष्ट्रात विविध ठिकाणी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून काम करत आहेत.  संकुलात एम ए एम सी जे हा अभ्यासक्रम अगोदर पासून सुरु होता  त्यात या अभ्यासक्रमाची भर पडली. 

विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक मीडियाचे चांगल्यातले चांगले शिक्षण

विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक मीडियाचे चांगल्यातले चांगले शिक्षण मिळावे या करिता माजी  कुलगुरू डॉ सर्जेराव निमसे यांच्या मार्गदर्शना खाली या संकुलाचे संचालक डॉ दीपक शिंदे यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे 12 व्या वित्त आयोगाच्या तरतूदि नुसार प्रस्ताव देऊन यंत्र सामुग्री मंजूर करून घेतली त्यातुन अँपल या कंपनीचे आय मॅक संगणक व व्हिडीओग्राफी करिता सोनी, निकॉन कंपनीचे व्हिडीओ व स्टील कॅमेरे खरेदी करण्यात आले आहेत. सोबतच मीडिया उद्योगात वापरले जाणारे एडिटिंग सॉफ्ट वेअर व अनुषंगीक साहित्य खरेदी करण्यात आले आहे याचा पूर्ण वापर विद्यार्थी करत असतात.  माजी कुलगुरू डॉ पंडित विद्यासागर यांच्या मार्गदर्शना खाली या संकुलाचे संचालक डॉ दीपक शिंदे यांनी व्हिडीओग्राफी पोस्ट प्रोडक्शन हा स्पेशलाइजेशन असलेला अभ्यासक्रम राबवला त्या तुन विद्यार्थ्यांना डाक्यूमेन्टरी तयार करण्याचे, फिल्म  प्रोडक्शन 

येथे क्लिक करानांदेड जिल्ह्यात भोसी येथे पोलिस प्रशिक्षण केंद्र सुरु करणार-  पालकमंत्री अशोक चव्हाण

रुसा कार्यालयात सादर केला तेथून स्टुडिओ करिता निधी प्राप्त झाला.

आणि वीडियो एडिटिंग करण्याचे तंत्र शिकविले जाते यामुळे राज्य स्तरावर मीडिया स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या शॉर्ट फिल्म निवडल्या जात आहेत.याच कालावधीत रुसा अंतर्गत आलेल्या एका संधीचा लाभ घेत स्टुडिओ उभारणीचा प्रस्ताव डॉ दीपक शिंदे यांनी तयार केला व विद्यापीठ प्रशासनाने तो रुसा कार्यालयात सादर केला तेथून स्टुडिओ करिता निधी प्राप्त झाला.

मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना याचा खूप फायदा होणार

कुलगुरू डॉ उद्धव भोसले यांनी वेळ न दवडता स्टुडिओचे काम मार्गी लावले आहे. बेंगलोर, हैदराबाद, मुंबई येथून कारागीर बोलावत विविध कंपन्याना काम देत हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. कोरोनामुळे हे काम प्रलंबित पडले आहे अन्यथा हा स्टुडिओ सुरु झाला असता. हा स्टुडिओ पूर्ण क्षमतेने सुरु  झाल्यावर मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना याचा खूप फायदा होणार आहे. काही व्यावसायिक कामे करून निधी उपलब्ध करता येणार आहे.अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अंतिम टप्प्यात आलेल्या या कामावर शेवटचा हात फिरवण्याचे काम सुरु आहे.

स्टुडिओच्या उभारणी करिता प्रारंभीच्या काळात परिश्रम

माध्यम शास्त्र संकुलाचे संचालक प्रा. डॉ दीपक शिंदे, प्रा.राजेंद्र गोणारकर, प्रा.सचिन नरंगले, प्रा. सुहास पाठक, प्रा.कैलास यादव, प्रा.राहुल पुंडगे, तांत्रिक सल्लागार अनुजा बोकारे हे वैयक्तिक रित्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात.त्या मुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध होत आहेत. प्रा. संपत पिंपळे व प्रा. अजित गागरे यांनी स्टुडिओच्या उभारणी करिता प्रारंभीच्या काळात परिश्रम घेतले होते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A state-of-the-art media studio at Srtm University nanded news