esakal | नांदेड : राज्य तलाठी संघातर्फे काम बंद करून निषेध
sakal

बोलून बातमी शोधा

राज्य तलाठी संघातर्फे काम बंद करून निषेध

राज्य तलाठी संघातर्फे काम बंद करून निषेध

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : महाराष्ट्र राज्य तलाठी संघ जिल्हा शाखेच्या वतीने तलाठ्यांना अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ सोमवारी (ता. ११) काम बंद आंदोलन करून तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले.

पुणे येथील राज्य समन्वय जमाबंदी आयुक्त रामदास जगताप यांनी तलाठी यांना असभ्य भाषा वापरल्याच्या निषेधार्थ कामबंद आंदोलन करून जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यामार्फत महसूलमंत्री यांना निवेदन देण्यात आले. नांदेडचे तहसीलदार किरण अंबेकर यांना शिष्टमंडळातर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी अध्यक्ष पी. डब्ल्यू. पाटील, सचिव आय. बी. मंडगीलवार, सहसचिव मनोज देवणे, कोषाध्यक्ष ज्योती निवडंगे, रेखा मंडगीलवार, राहुल चव्हाण, के. आर. घुगे, सी. पी. कंगळे, गजानन नांदेडकर, अनिल धुळगंडे, मंगेश वांगीकर, अहिरराव पाटील, शिवकुमार मंगनाळे, अश्विनी सोलापुरे, स्नेहल खेडकर, साधना देशपांडे, रंजना दमकोंडवार, नारायण गाडे, पुष्पलता गायकवाड, बी. ए. मोरे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: Power Crisis: कोळसा, रेल्वे आणि ऊर्जा मंत्रालयानं स्थापन केला 'आपत्ती गट'

तलाठी, मंडळ अधिकारी, पटवारी आदींनी गुरूवारी (ता. सात) आणि शुक्रवारी (ता. आठ) काळ्या फिती लाऊन कामकाज केले. त्यानंतर सोमवारी (ता. ११) तहसील कार्यालयासमोर कार्यालयीन वेळेत निर्दशने करण्यात आली. मंगळवारी (ता. १२) मंत्री, राज्यमंत्री, खासदार, आमदार यांना आंदोलनाची माहिती देणे आणि आयुक्त रामदास जगताप यांची अन्यत्र बदली झाली नाही तर ता. १३ आॅक्टोंबरपासून कामावर बहिष्कार टाकण्यात येणार असल्याचे तलाठी संघाने निवेदनात नमूद केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातही निवेदन सादर करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष एन. जी. कानगुले, राज्य प्रतिनिधी उदयकुमार मिसाळे, सचिव चंद्रकांत महाजन, जिल्हा संघटक एन. आर. गाढे, विभागीय अध्यक्ष आर. एस. सोनुले, तालुकाध्यक्ष बी. के. वसमतकर, एल. आर. देशमुख, रोहिदास म्हेत्रे, अनिरुद्ध जोंधळे आदींची उपस्थिती होती.

loading image
go to top