नांदेड परिक्षेत्रातील अवैध धंदे बंद करा- पोलिस अधिकाऱ्यांना निसार तांबोळींच्या सुचना

प्रल्हाद कांबळे
Friday, 6 November 2020

लाॅकडाउनमधील कौटुंबिक छळाच्या व हिंसाचाराच्या घटनांबाबत प्रतिबंध करणार असून गुन्हेगारांच्या टोळींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी सांगितले. 

नांदेड : परिक्षेत्रात कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे सुरु राहता कामा नये. असे धंदे सुरु असल्याचे समजताच संबंधीत पोलिस अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल. तसेच लाॅकडाउनमधील कौटुंबिक छळाच्या व हिंसाचाराच्या घटनांबाबत प्रतिबंध करणार असून गुन्हेगारांच्या टोळींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी सांगितले. 

लाॅकडाउन काळात मोठ्या प्रमाणात परिक्षेत्रात कौटुंबिक छळाच्या व हिंसाचाराच्या घटना घडल्या. नांदेड परिक्षेत्रअंतर्गत असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना या घटनांमधील आरोपीविरुद्ध प्रतिबंध करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती निसार तांबोळी यांनी दिली आहे. नांदेड परिक्षेत्रातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यात आपण यापूर्वी काम केले आहे. त्यामुळे येथील गुन्हेगारीच्या परिस्थितीची आपल्याला माहिती आहे.

हेही वाचा - रेल्वेकडून गुड न्यूज : उत्सव काळात नांदेड रेल्वे विभागाकडून ११ रेल्वे सुरु -

निर्माण झालेल्या गुन्हेगारीवर लक्ष केंद्रीत

लाॅकडाउनच्या काळात वेगवेगळ्या स्वरुपाच्या टोळ्या गुन्हेगारीला तोंड फुटले. परंतु उपलब्ध असलेले कायदे, आवश्यक असलेले मनुष्यबळ, वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करुन त्यावर नियंत्रण मिळविता आले. नांदेडमध्ये टोळीयुद्ध आणि त्यातून निर्माण झालेल्या गुन्हेगारीवर लक्ष केंद्रीत करताना त्यांनी सांगितले की, अनेक व्यापारी व उद्योजकांना खंडणीसाठी येत असलेल्या समस्या व त्यातून निर्माण झालेली भीती याबाबत अधिकारी व व्यापाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीतून बऱ्याच गोष्टी समोर आल्याचे त्यांनी सांगितले.

येथे क्लिक करानांदेडमध्ये लॉकडाऊननंतर प्रथमच होणार लाखोंची उलाढाल

परिक्षेत्रातील गुन्हेगारी कमी होत आहे

नांदेड शहरातील गोळीबार, धाक दाखवून रक्कम पळविणे, मोठे दरोडे या प्रकरणातील आरोपींवर कारवाई करुन अटक करण्यात आली. अजूनही अनेक गुन्हेगार कारागृहात शासकिय पाहूणचार घेत आहेत. सामाजिक सलोखा कायम रहावा, जातीय तणाव वाढू नये या घटनांना आवर घालावा, सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करावेत अशा सूचना परिक्षेत्रातील पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी सांगितले. कौटुंबिक हिंसाचाराच्या संदर्भात वाढत असलेल्या घटना चिंताजनक असल्याने याबाबत समाजात जनजागृती आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. नांदेड परिक्षेत्रातील गुन्हेगारी कमी होत असल्याचे श्री. तांबोळी यांनी यावेळी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stop illegal trades in Nanded area- Nisar Tamboli's instructions to police officers nanded news