
पिडितेच्या कुटुंबाला न्याय देण्याबरोबरच दोषींविरुद्ध ॲट्रासिटी कलमांतर्गत कठोर कारवाई करु अशी नि: संदिग्ध ग्वाही केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.
नांदेड : बिलोली येथील मुकबधिर दिव्यांग पिडितावर झालेला अत्याचार हा मानवतेला काळिमा फासणारा आहे. या पिडितेच्या कुटुंबाला न्याय देण्याबरोबरच दोषींविरुद्ध ॲट्रासिटी कलमांतर्गत कठोर कारवाई करु अशी नि: संदिग्ध ग्वाही केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. बिलोलीला रवाना होण्यापूर्वी त्यांनी शासकिय विश्रामगृहात जिल्ह्यातील विविध सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा आढावा घेतला. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर उपस्थित होते.
रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली संपन्न
नांदेड : जिल्ह्यातील रस्ते अपघात व त्याद्वारे होणाऱ्या मृत्यचे प्रमाण कमी करण्याच्या हेतूने आयोजित 32 वा रस्ता सुरक्षा अभियानचा प्रारंभ आज मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सायकल रॅलीचा प्रारंभ झाला.
हेही वाचा - मारहाण करुन लूटणाऱ्या एकास पोलिस कोठडी; विमानतळ ठाण्याचे एपीआय विजय जाधव यांची कारवाई
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलिस अधिक्षक प्रमोद शेवाळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांची उपस्थिती होती. या रॅलीस जिल्हाधिकारी कार्यालय येथून पोलिस अधिक्षक कार्यालय- कलामंदिर, आयटीआय- वर्कशॉप कॉर्नर- भाग्यनगर- आनंदनगर- नागार्जुना हॉटेल चौक ते अण्णाभाऊ साठे चौक या मार्गाने निघून आयटीआय येथे रॅलीचा समारोप झाला. या रॅलीत जिल्हाभरातून विविध सायकल ग्रुपचे सदस्य, शासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी सहभाग घेतला होता. या रॅलीचा समारोप प्रसंगी रस्ते सुरक्षेवर बनविण्यात आलेल्या साहित्याचे विमोचन पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या हस्ते झाले.
प्रास्ताविकात प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी रस्ते सुरक्षा अभियानाचे स्वरुप, उद्देश व आगामी महिन्याभरात होणाऱ्या जनजागृतीपर कार्यक्रमाचे विवेचन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.