नांदेडमध्ये कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल

40% vacancies for technical education marathi news kolhapur
40% vacancies for technical education marathi news kolhapur

नांदेड : कोरोनामुळे (Corona) ऑनलाइन अभ्यासासोबतच अनेक विषयाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या. त्यातच दहावी-बारावी बोर्डाच्या गुणदानाच्या पद्धती देखील बदल झाला. त्यामुळे बहुतेक शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. असे असले तरी, कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाकडे (Skills Based Syllabus) विद्यार्थ्यांचा सर्वाधिक ओढा वाढला आहे. त्यामुळे शहरातील नामांकित महाविद्यालयात (Online Education) प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. अगदी दोन वर्षांपूर्वीचे चित्र बघितल्यास दिसून येते की, मनासारख्या शाखेला प्रवेश मिळावा म्हणून दहावी-बारावीचे विद्यार्थी व त्यांचे पालक चिंतेत असायचे, त्यासाठी दिवसरात्र जाऊन अभ्यास करत होते. परंतु कोरोनाकाळात शाळा, महाविद्यालय पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान शिक्षण विभागास देखील शिक्षण प्रणाली व दुणदानात मोठे बदल करावे लागले. त्यात दहावीच्या (SSC) विद्यार्थ्यांना गुणदान करताना त्यासाठी इयत्ता नववीत दोन घटक चाचणी आणि एक सत्र परीक्षा, दहावीच्या विविध सराव परीक्षा ऑनलाइन पार पडल्या.

40% vacancies for technical education marathi news kolhapur
तब्बल ३६ वर्ष सेवा केल्यानंतरही पेन्शन केवळ ८१० रुपये

या दोन्ही परीक्षांमध्ये मिळालेले गुण एका सूत्रात बांधून विद्यार्थ्यांना अंतिम गुणदान केले गेले आहे. यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने ‘ऑप्टिकल मार्क्स रीडिंग’या पद्धतीचा वापर केला गेला. ही जबाबदारी शाळा पातळीवर दिली गेली. त्यामुळे परीक्षेला बसला तो विद्यार्थी पास, जो विद्यार्थी परीक्षाला हजर नाही तो नापास असे एकंदरीत समिकरण झाले. अन् शाळांचा निकाल शंभर टक्के लागल्याचे चित्र पाहावयास मिळाले. यात हुशार विद्यार्थ्यांचे मात्र काही प्रमाणात नुकसान झाल्याची भावना देखील त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. या पुढे देखील विद्यार्थ्यांना सिलॅबस पूर्ण करण्यासाठी शाळा-महाविदायालयात जाण्याची गरज नाही. त्यामुळे गावाकडील विद्यार्थी शहरात न येता. गावाकडच्या ठिकाणी असलेल्या शाळा महाविद्यालयात प्रवेश घेण्यास प्राधान्य देत आहेत.

40% vacancies for technical education marathi news kolhapur
सरकार आपले पण कामे होत नाहीत, प्रणिती शिंदेंची नाराजी

विद्यार्थ्यांची मागणी वाढेल

लातूर बोर्डाचा आणि सीबीएससी बोर्डाचा निकाल लागला असला तरी, सीबीएससी पॅटर्नच्या विद्यार्थ्याच्या हातात मार्क मेमो मिळाला नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पहिली आॅनलाइन प्रवेश फेरी पूर्ण होत अली असली तरी, विद्यार्थ्यांनी त्याप्रमाणत शहरातील नामांकित महाविद्यालयाकडे प्रवेशासाठी ऑनलाइन नोंद केली नाही. त्यामुळे पहिल्या टप्यात नामांकित महाविद्यालयाचा प्रवेशाचा कोटा पूर्ण होणार नसला तरी, शेवटच्या राऊंडमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची मागणी वाढेल अशी अपेक्षा महाविद्यालय प्रशासनाकडुन व्यक्त केली जात आहे.

40% vacancies for technical education marathi news kolhapur
लाईट का बंद केली, असा जाब विचारत महावितरण कर्मचाऱ्यास मारहाण

पूर्वी अकरावी - बारावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची चढा ओढ लागलेली असायची, परंतु कोरोनामुळे ऑनलाइन प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांची संख्या तीन पटीने कमी झाली. ही सर्वच महाविद्यालयाची परिस्थिती आहे. परंतु शेवटच्या राऊंडमध्ये चांगला प्रतिसाद मिळेल आणि जागा पूर्ण भरल्या जातील.

- डॉ. आर. एम. जाधव, प्राचार्य पिपल्स महाविद्यालय, नांदेड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com