esakal | Success story:पळसा येथील शेतकऱ्याने एक हेक्टर शेतीत रोपवाटिका व फळबागेतुन घेतले चांगले उत्पन्न 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

पळसा ता. हदगांव येथील सदाशिव घिरटकर (बाळु महाराज) यांची मानवाडी येथील तिर्थक्षेत्र हनुमान मंदीरालगत अंबाळा शेतशिवारात गट क्रं ५८ मध्ये पळसा ते मानवाडी नागपूर- तुळजापूर राष्ट्रीय महामार्गालगत पाच एकर जमीन होती.

Success story:पळसा येथील शेतकऱ्याने एक हेक्टर शेतीत रोपवाटिका व फळबागेतुन घेतले चांगले उत्पन्न 

sakal_logo
By
प्रभाकर दहीभाते

बरडशेवाळा (ता. हदगाव जिल्हा नांदेड) - शेतकरी शेतीमध्ये अहोरात्र मेहनत घेऊन काम करत असताना वेळोवेळी बदलत्या वातावरणाचा फटका बसत असल्याने अडचणीत सापडला आहे. पळसा (ता. हदगाव) येथील अल्पभुधारक शेतकरी सदाशिव घिरटकर यांनी रोपवाटिका व फळबाग लागवड करुन अंतर पिक उत्पादन करीत चांगले उत्पादन मिळवले आहे.

पळसा ता. हदगांव येथील सदाशिव घिरटकर (बाळु महाराज) यांची मानवाडी येथील तिर्थक्षेत्र हनुमान मंदीरालगत अंबाळा शेतशिवारात गट क्रं ५८ मध्ये पळसा ते मानवाडी नागपूर- तुळजापूर राष्ट्रीय महामार्गालगत पाच एकर जमीन होती. रोडलगतची खरबाड जमीन पिकत नसल्याने काही वर्षांपूर्वी तिनं एकर जमीन विक्री केली. आज करोडपती होण्याचे स्वप्न होते पण हार न मानता दोन एकर जमीन क्षेत्रात दोन मुलांच्या मदतीने शेतात विहीर करुन एका मुलांना बारामती येथे प्रशिक्षण देऊन नव्या उमेदीने शेती सुरु केली.

हेही वाचा नांदेडकरांसाठी गुड न्यूज : रक्त पिशवीच्या दराबाबत आता दर निश्चित -

साठ गुंठे जमीन क्षेत्रात पपई लागवड करुन अंतर पिक म्हणून गोभी व वांगे लागवड

दोन एकर जमीन क्षेत्रात चांगल्या दर्जाची झेंडुची लागवड करुन या वर्षी झेंडुला चांगली मागणी असल्याने कमाई झाली. तर दोन एकर जमीनीपैकी विस गुंठे क्षेत्रात सोयाबीन व नंतर चांगल्या दर्जाचा गहू पेरणी केली. तर बाकी साठ गुंठे जमीन क्षेत्रात पपई लागवड करुन अंतर पिक म्हणून गोभी व वांगे लागवड केली. दहा गुंठे जमीनीत भाजीपाला लागवड केली. तर बाकीच्या जमीनीत शेड उभारून दोन मुले व स्वतः कुटुंबाला सोबत घेऊन जय हनुमान रोपवाटिका सुरु केली असल्याने परीसरातील शेतकऱ्यांना रोप खरेदीसाठी अर्धापूर, पार्डी येथे जावे लागत होते. ते आता मानवाडी येथे सर्वच रोपे तयार करुन मिळत असल्याने दोन एकर जमीन क्षेत्रात चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळाले आहे. शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवीत असल्याने महात्मा फुले योजनेसाठी अर्ज दाखल केला आहे.  शेतकरी सदाशिव घिरटकर (बाळु महाराज) यांनी सांगितले.

जय हनुमान रोपवाटिका व फळबाग उभारली

मला राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात एवढे पैसे मिळतात असे वाटले नव्हते. पण परीस्थितीमुळे जमिन विकली तरी पण खचुन न जाता जिद्दीने मुलांना बारामती येथे प्रशीक्षण दिले. जय हनुमान रोपवाटिका व फळबाग उभारली आहे. नवनवीन दर्जेदार रोपे तयार केली जात असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी येत असल्याने चांगले उत्पादन मिळत असुन शासनाच्या महात्मा फुले योजनेकडे अर्ज केला आहे.
- सदाशिव घिरटकर, शेतकरी, पळसा.

संपादन - प्रल्हाद कांबळे