
नवीन नांदेड : कधीही हार न मानणाऱ्या जिद्दीसमोर अपयश टिकत नाही, हे खरं करून दाखवलं आहे वैभव पईतवार या तरुणाने. एका अपघातात दोन्ही हात गमावले, आर्थिक परिस्थिती हलाखीची, पण स्वप्न मात्र मोठे शासकीय अधिकारी होण्याचे! आज तो महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) गट क लिपिक-टंकलेखक पदासाठी पात्र ठरला आणि हजारो तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत बनला.