Success Story : नांदेडची पूजा सैन्य दलातील आसाम रायफलमध्ये

चंद्रकांत सूर्यतळ
Wednesday, 27 January 2021

कठिण परिश्रम घेत देश सेवा करण्यासाठी सर्व समस्येवर मात करत तीने अखेर हे यश संपादन केले.

बरबडा ( जिल्हा नांदेड ) : बरबडा येथील शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या पुजा भुसलवाड हीने कठिण परिश्रम घेत देश सेवा करण्यासाठी सर्व समस्येवर मात करत तीने अखेर हे यश संपादन केले. तीची आसाम राफलमध्ये निवड झाली. तिच्या या निवडीमुळे बरबडा गावात आनंदाचे वातावरण असून तिचा शाळा व गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

आसाम रायफलमध्ये नव्याने जवानांची भरतीसाठी सन २०१८ मध्ये पूर्व व मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. या मुलाखतीत व वैद्यकीय चाचणीचा अंतिम निकाल ता. २५ जानेवारी रोजी जाहिर करण्यात आला. यात नायगाव तालुक्यातील बरबडा येथील पुजा हिची सैन्य दलात निवड झाली. शेतकरी कुटुंबातील अतिशय मेहनतीने यश तिने संपादन केले. 

या यशाबद्दल बरबडा परिसरातील तिचे कौतुक होत आहे. बरबडा येथील जवाहरलाल नेहरु माध्यमीक विद्यालयात शालेय शिक्षण पूर्ण झाले होते. आपल्या आई वडीलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व देशसेवेसाठी मुलींनीही पुढे यावे असे आवाहन करत आई- वडिल व गुरुजणांचा पाठीशी असलेल्याआशिर्वादामुळे मी हे यश संपादन करु शकलो. 
 

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Success Story: Worship of Nanded in Assam Rifles in the Army nanded news