esakal | व्हाट्सअॅपचा असाही गैरफायदा : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थीनीशी चाळे; गुन्हा दाखल

बोलून बातमी शोधा

file photo}

बाबूराव मोरे या नराधम शिक्षकाचे नाव असून त्याने अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे व मोबाईलवरुन अश्लील चॅटिंग करुन छेडछाड केली आहे. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरुन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हाट्सअॅपचा असाही गैरफायदा : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थीनीशी चाळे; गुन्हा दाखल
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : मुदखेडमधील एका बालकाश्रमातील अत्याचाराची घटना ताजी असतानाच पुन्हा नांदेडात आणखी एका चिमुकलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना पुढे आली. नायगाव तालुक्यातील एका शाळेत हा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे शिक्षकानेच विद्यार्थींनीशी अश्लील वर्तन केले आहे. या प्रकरणी कुंटूर पोलिस ठाण्यात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला अटक केले आहे. 

आरोपी शिक्षक हा पीडित मुलीला तुला परीक्षेत चांगले गुण देतो म्हणून अश्लील चाळे व मोबाईलवर चॅटिंग करत होता. सदर बाब पीडित मुलीने पालकांना सांगितली. ही बाब समजल्यानंतर पालकांनी गावकऱ्यांसमवेत शाळेत जाऊन सदर शिक्षकास याविषयी जाब विचारला. तेव्हा शिक्षकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. तेव्हा जमलेल्या लोकांनी शिक्षकाला चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्यांनी त्या शिक्षकाला पोलिसांच्या हवाली केले. कुंटूर पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक करुन विनयभंग, पोस्को आणि अॅट्रासिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

अल्पवयीन मुलींच्या अत्याचारात वाढ-

मुदखेड अत्याचाराच्या घटनेला काही तास देखील उलटले नाहीत. त्यातच नांदेड जिल्ह्यात आणखी एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना पुढे आली आहे. जिल्ह्यात मुलींवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. या पूर्वी देखील असे अनेक प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे अशा घटना थांबवण्याचे आव्हान पोलिस प्रशासनासमोर उभे राहिले आहे.