esakal | Video- शिक्षक दिन विशेष : निवृत्त शिक्षकाचा असाही छंद
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded News

निवृत्त शिक्षक भगवानराव जाधव यांनी शेतामध्ये विविधप्रकारची वृक्ष लावून त्याची जोपासनाही करत आहेत. वयाच्या ऐंशिव्या वर्षातही त्यांचा हा उत्साह प्रेरणादायी असाच आहे.

Video- शिक्षक दिन विशेष : निवृत्त शिक्षकाचा असाही छंद

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड : वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ हा संत तुकाराम महाराजांचा अभंग निसर्गप्रेमाचे उत्तम उदाहरण आहे. त्या अनुसरूनच तळणी (ता.हदगाव) येथील निवृत्त शिक्षक भगवानराव जाधव यांनी शेतामध्ये विविधप्रकारची वृक्ष लावून त्याची जोपासनाही करत आहेत. वयाच्या ऐंशिव्या वर्षातही त्यांचा हा उत्साह प्रेरणादायी असाच आहे. 

हवामानात दिवसेंदिवस होत असलेल्या बदलामुळे  झाडाची किंमत गेल्या काही वर्षांमध्ये कळू लागली आहे. एकीकडे भारत तरुणांचा देश म्हणून ओळखल्या जातो. परंतु तरुणांमध्ये झाडे लावण्याची आवड मात्र दिसत नाही. परंतु वयाची ऐंशी ओलांडल्यानंतरही निवृत्त शिक्षक भगवानराव जाधव यांनी साठपेक्षा जास्त झाडे लावून त्यांना वाढवलेही. आज ही झाले शेत शिवारामध्ये डौलाने डोलत आहेत. 

हेही वाचा - घराबाहेरच्या भागात शाळा बंद, शिक्षण सुरू, काय आहे उपक्रम

निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी महत्त्वाचा उपाय म्हणजे वृक्षारोपण होय. अनेकदा वृक्षारोपण कार्यक्रम साजरे केले जातात. पण त्याचे पुढे काय, होते हे प्रत्येकाला सर्वश्रुतच आहे. कारण झाडे लावणे ज्याप्रमाणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे त्यांना वाढवणे, त्यांचे जतन करणे महत्त्वाचे आणि कठीण काम आहे. प्रत्येकाने एकतरी झाड लावलं पाहिजे, वाढवीलं  पाहिजे. त्यानुसार झाडे लावली जातात, पण त्याचे संगोपन केलं जातं नाही. परिणामी ही झाडे निष्काळजीपणामुळे वाढतच नाहीत. 

हेही वाचलेच पाहिजे - नांदेड जिल्ह्यातील शिक्षकांना पुरस्कार जाहीर

वृक्षारोपण केल्यानंतर त्याला जाळी लावत नसल्याने ती रोपे जनावरे खाऊन टाकतात. सर्व सोयी सुविधा उपलब्ध असतानाही झाडे लावल्या जात नाही किंबहुना लावली तर ती जगविल्या जात नाही, अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.  परंतु प्रत्येकाने आप-आपल्या परीने वाटा उचलून कार्यास सुरुवात केली की काही वॉर्षातच त्याचा परिणाम निश्चितपणे दिसून येवू लागतो, हेच तळणी येथील भगवानराव जाधव यांनी सिद्ध करून दाखवले आहे.

हे देखील वाचाच -  वेशीमधला वाद थेट पोहचला पोलिस ठाण्यात, काय आहे कारण?

लहानपणापासूनच निसर्गाची ओढ भगवानराव जाधव यांना शांत बसू देत नाही. शिक्षक असतानाही विद्यार्थ्यांना पुढे करून वृक्षारोपण करून त्यांची जोपासना करण्यात त्यांनी सातत्य ठेवले. आज वयाची ऐंशी ओलांडल्या नंतरही निसर्गाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नाही. आयुष्यात अनेक विद्यार्थी घडविले त्याप्रमाणे झाडेही लावण्याची आणि वाढविण्याची जिद्द त्यांच्यात निर्माण झाली.

येथे क्लिक कराच - नांदेडच्या ‘स्वारातीम’ विद्यापीठात ता. ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन

सेवानिवृत्तीनंतर त्यांनी शेतामध्ये साठपेक्षा अधिक विविधप्रकारची रोपे लावली. त्यांना काठीण्य पातळीवर पाणी टाकून वाढवली. जगवली. कारण लावलेले झाड व्यवस्थितरीत्या जगविले तरच निसर्गाचा समतोल राखला जाईल, असे ते नेहमी सांगतात. आंबा, पेरू, लिंबोनी, चिंच, जांभूळ, आवळा, अशोक, शेवगा, सीताफळ, करंजी, कडुनिंब, बदाम अशी विविध जातीची, तसेच पक्ष्यांच्या हक्कांचे निवासस्थान असणारी झाडे त्यांनी आपल्या शिवारात लावली आहेत.

वयोमानानुसार आता शेत शिवारातील झाडांची देखभाल मुलगा राजेंद्र बघत आहे. खरंतर निसर्गचक्र अबाधित राखण्यातच आपले हित आहे. त्यासाठी प्रत्येकाने 'एकतरी झाड लावणे व ते जगविने आवश्यक आहे. 
- भगवानराव जाधव, नांदेड

loading image