बापरे : नांदेड जिल्ह्यात कंटेनमेंट झोनची एवढी संख्या...?

file photo
file photo

नांदेड : शहर व जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या संक्रमनावर नियंत्रण मिळावे यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तारेवरची कसरत करण्यात येत आहे. मात्र प्रशासनाला नागरिक पाहिजे असा प्रतिसाद देत नसल्याने किंबहूना कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असल्याचे दिसुन येत आहे. रुग्ण संख्या वाढत असतांना त्याच गतीत कन्टेनमेंट झोनची संख्या वढत आहे. जिल्ह्यात जवळपास अडीचशेहून अधिक झोन झाले आहेत. 

शहरासह ग्रामिण भागातही कोरोनाने आपले पाय पसरवले आहे. त्यामुळे संख्या झपाट्याने वाढली आहे. आज अकराशेहून अधिक रुग्ण झाले आहेत. त्यापैकी निम्याहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात करत आपले घर गाठले आहे. या कोरोनाचा सर्वाधिक फटका नांदेड शहराला बसला आहे. त्यामुळे कन्टेनमेंट झोनची संख्याही अधिक आहे. शहरातील वजीराबाद झोनमध्ये सर्वात तर सर्वात कमी अशोकनगर झोनमध्ये आहेत.

कोरोनाच्या संसर्गाचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे

कोरोनाच्या संसर्गाचा आलेख दिवसेंदिवस वाढत असून शहराच्या विविध भागांमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर महापालिकेच्या वतीने कंटेनमेंट घेऊन जाहीर करण्यात येत आहेत. शुक्रवारी (ता. २४) कंटेनमेंट झोनची संख्याही मोठी झाली आहे. ११६९ रुग्ण बाधीत झाल्याने जिल्हा प्रशासनही हतबल झाल्याचे दिसुन येत आहे. शहर व जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत असल्याने कंटेनमेंट झोनची संख्या त्याच गतीने वाढत आहे. सर्व शहरातील सर्वाधिक कंटेनमेंट वजीराबाद झोनमध्ये तर सर्वात कमी अशोकनगर झोनमध्ये लावण्यात आले आहेत. नांदेड शहरात पहिला कंटेनमेंट झोन हा एप्रिल महिण्यात पीरबुर्‍हाणनगरमध्ये लावण्यात आला होता. त्यानंतर कोरोनाचा संसर्ग वाढत गेला.

अडीचशे ठिकाणी कन्टेनमेन्ट झोन

ता. २४ जुलैपर्यंत शहरात दोनशे तर ग्रामिण भागात पन्नास ठिकाणी कंटेनमेंट झोमन जाहीर कऱण्यात आले आहेत. शहरातील महानगरपालिकेने घोषित केले वजीराबाद क्षत्रिय कार्यालयाअंतर्गत ४३, इतवारा ४०, तरोडा २३, शिवाजीनगर २४, सिडको २४, अशोकनगर अंतर्गत २२ कंटेनमेंट झोन आहेत.शहरातील काही नगरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाल्यानंतर कंटेनमेंट झोन शिथिल करण्यात आले आहेत. यात वजिराबाद सहा, अशोक नगर पाच, शिवाजीनगर १२, वजीराबाद १२, सिडको पाच असे सहा छत्रिय कार्यालयांतर्गत ४८ कंटेनमेंट झोनचा समावेस होता. हे झोन आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्या आदेशाने खुले करण्यात आले आहेत.

 नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये

यासोबतच ग्रामीण भागात देगलूर, मुखेड, भोकर, किनवट, हदगाव, उमरी, लोहा, कंधार, धर्माबाद, बिलोली या तालुक्यातही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने    वाढत असल्याने त्याठिकाणी कंटेनमेंट झोन लावण्यात येत आहेत. पूर्वी ज्या भागात रुग्ण आढळला तो भाग किंवा परिसर प्रतिबंधित करण्यात येत होता. परंतु नंतरच्या आदेशानंतर ज्या भागात रुग्ण आढळला त्याचे फक्त घर प्रतिबंधित क्षेत्र करण्यात येत आहे. उर्वरित नगरातील लोकांना तपासणी करून त्यांना कंटेनमेंट झोनमध्येमधून वगळण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी यांच्यासह सर्वच अधिकारी कंटेनमेंट झोन आणि रुग्ण वाढू नये याची खबरदारी घेत असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे सतत आवाहन करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com