esakal | आपल्या व कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेत शेजाऱ्यांशी बांधीलकी ठेवा- प्रमोदकुमार शेवाळे

बोलून बातमी शोधा

file photo}

नांदेड पोलिस दलातील तीन पोलिस अधिकारी व सहा पोलिस अमलदार यांचा नियत वयोमानानुसार रविवारी ( ता. 28) फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त झाले.

आपल्या व कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेत शेजाऱ्यांशी बांधीलकी ठेवा- प्रमोदकुमार शेवाळे
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : कर्तव्य कठोर व शिस्तीच्या खात्यात प्रदीर्घ सेवा दिल्यानंतर आता नियतवयोमानानुसार निवृत्ती असते. या काळात आपल्या आरोग्या सोबतच कुटुंबाच्या आरोग्याकडे आणि विशेष करुन शेजारी राहणाऱ्या इतर कुटुंबीयांना सामाजिक बांधीलकीच्या नात्याने येणाऱ्या काळात मदत करावी असे आवाहन पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी केले. जिल्हा पोलिस दलातील अधिकारी व अमलदारांना निरोप देताना श्री शेवाळे बोलत होते.

नांदेड पोलिस दलातील तीन पोलिस अधिकारी व सहा पोलिस अमलदार यांचा नियत वयोमानानुसार रविवारी ( ता. 28) फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त झाले. यानिमित्त आयोजित केलेल्या पोलिस अधीक्षक कार्यालयातील चिंतन हॉल येथे कार्यक्रमात पोलिस अधीक्षक बोलत होते. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, पोलिस उपअधीक्षक मुख्यालय डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांची उपस्थिती होती.

यावेळी सर्व सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व अमलदारांना भेटवस्तू देऊन त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व निवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिस अधीक्षकांनी पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी शिवाजी लष्करे, शिवप्रकाश मुळे यांच्यासह महिला सहाय्य कक्षाच्या समन्वयक सुचित्रा भगत यांच्यासह पोलिस कल्याण विभागाच्या महिला पोलीस राखी कसबे, जनसंपर्क कार्यालयाचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक उत्तम वाघमारे, हवालदार सूर्यभान कागणे, रेखा इंगळे यांची उपस्थिती होती.

सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये पोलिस निरीक्षक दिलीप परबत पाटील, अब्दुल समद शेख अहमद जरगर, राखीव पोलिस उपनिरीक्षक जमील इस्माईल सय्यद, महिला सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुजाता धोंडीबा गायकवाड, नागसेन बानाजी हाटकर, हनुमंत व्यंकटराव होनराव, हवालदार रघुनाथ चव्हाण, राजया माकुलवार आणि चालक नूरोद्दीन निजामुद्दीन शेख यांचा समावेश होता.