esakal | कोरोना रूग्णांसाठी उपाययोजना करा- विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांसाठी बेड इतर सुविधांच्या उपाययोजना कराव्यात अशा सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे.

कोरोना रूग्णांसाठी उपाययोजना करा- विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांसाठी बेड इतर सुविधांच्या उपाययोजना कराव्यात अशा सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे.

विभागीय आयुक्त केंद्रेकर हे गुरुवारी (ता. १३) जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, श्री गुरु गोविंद सिंघजी शासकीय रुग्णालयाला पीपीई कीट घालून भेट देऊन येथील सुविधांचा आढावा घेतला. या भेटीमध्ये कोरोना संसर्ग बाधित रुग्णांसाठी काय सुविधा करण्यात आल्या आहेत याची माहिती घेतली. डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मध्ये १३ हजार लिटर व श्री गुरू गोविंद सिंगजी रुग्णालयांमध्ये दहा हजार लिटर ऑक्सीजन निर्माण करणाऱ्या ठिकाणची देखील त्यांनी पाहणी केली व आढावा घेतला.

विभागीय आयुक्तांनी केली रुग्णालयात जावून प्रत्यक्ष पाहणी

भविष्यात रुग्णांना ऑक्सिजनची कमी पडणार नाही असे नियोजन जिल्हा प्रशासनाने केल्याची माहिती त्यांना जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी दिली. विभागीय आयुक्तांनी शासकीय रुग्णालयांना भेट दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात कोवीड- १९ या उपाययोजना संदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये जिल्ह्यात कोरोना संदर्भात करण्यात आलेल्या तयारीची माहिती देण्यात आली. यावेळी विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी इतर जिल्ह्याच्या मानाने नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनावर समाधान व्यक्त केले आहे.

हेही वाचा - जन्मदाता निष्ठूर झाल्याने मुलींवर आली ‘ही’ वेळ...

बैठकिला यांची होती उपस्थिती

बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटणकर, महापालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे आदींची उपस्थिती होती. 

जिल्ह्याच्या नियोजनावर समाधान 

विभागीय आयुक्तांनी शासकीय रुग्णालयाला भेट दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात कोवीड -१९ च्या उपायोजना संदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये जिल्ह्यात कोरोनासंदर्भात करण्यात आलेल्या तयारीची माहिती देण्यात आली. यावेळी सुनिल केंद्रेकर यांनी इतर जिल्ह्याच्या मानाने नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनावर समाधान व्यक्त केले.