

संतोष जोशी
नांदेड : काही दिवसांपासून जिल्ह्यातील राजकीय वातावरण महायुतीतील नेत्यांमध्ये जुंपल्यामुळे तापले आहे. शिवसेनेच्या आमदारांनी माजी मुख्यमंत्री तथा भाजप नेते खासदार अशोक चव्हाणांवर व्यक्त केलेली नाराजी, भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले प्रताप पाटील चिखलीकर यांनीही चव्हाणांवर केलेली टीका यामुळे सध्या चर्चा रंगली आहे.