शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार देण्याचे आश्वासन ठाकरे सरकारांनी द्यावे- पंकजा मुंडे

बा. पू. गायखर 
Wednesday, 21 October 2020

नांदेड  जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. सदर नुकसान भरुन निघणे शक्य नाही. मात्र सरकारने हा विषय गांभीर्याने घेऊन शेतकऱ्यांना तत्काळ बिनाअट मदत करा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. 

लोहा : शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढा देणार आहोत.  नांदेड  जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. सदर नुकसान भरुन निघणे शक्य नाही. मात्र सरकारने हा विषय गांभीर्याने घेऊन शेतकऱ्यांना तत्काळ बिनाअट मदत करा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. हतबल बळीराजा जेव्हा पंकजाताईला मदतीसाठी हाक मारतो..!

नांदेड- लोहा तालुक्यातील पारडी येथे एका वयोवृद्ध शेतकऱ्यानं पंकजा मुंडे यांना पाहताच हंबर्डा  फोडला. आमचं सगळं गेलं आम्ही कसं जगायचं असा सवाल या शेतकऱ्यानं विचारला. पंकजा मुंडे यांनी देखील या शेतकऱ्याचं सांत्वन केलं. 

हेही वाचा कलंबर कारखान्याची विक्री प्रक्रिया पूर्ण करण्याचा जिल्हा बॅंकेत ठराव -

ताई इकडं या माझ्या शेतात बघा आम्ही कसं जगायचं

दुष्काळ पाहिणी करण्यासाठी भाजपाच्या केंद्रीय सचिव पंकजा मुंडे नांदेड दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी नांदेड आणि लोहा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी त्यांनी केली. बाजूच्या शेतात पाहणी करत असलेल्या पंकजा मुंडे यांना पाहून या शेतकऱ्याला रडू कोसळलं. ताई इकडं या माझ्या शेतात बघा आम्ही कसं जगायचं. मूग गेला, सोयाबीन गेला, कापूस केला आमचं सगळं गेलं.. आम्ही कसं जगायचं असा प्रश्न वयोवृद्ध शेतकरी पांडुरंग पवार यांनी  विचारला.. पंकजा मुंडे यांनी देखील या शेतकऱ्याला सावरण्याचा प्रयत्न केला. यावेळी गोपीनाथ मुंडे यांची आठवण देखील शेतकऱ्यांनी काढली.

येथे क्लिक करावाळूचोरीच्या भानगडीत पडू नका

दौऱ्यात प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता

यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने रुमने आणि चाबूक फडणवीस यांना भेट दिली. या दौऱ्यात प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.या वेळी धर्मवीर शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी व सरपंच राम पवार उप सरपंच शरद पावर संगणक परिचालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संग्राम पाटील डिकळे व गावातील सर्व पदाधिकारी उपस्थितहोते. 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thackeray government should promise to give 25,000 hectares to farmers Pankaja Munde nanded news