काळ आला होता पण, वेळ आली नव्हती ! काय आहे प्रकरण वाचा...?

कंधार तालुक्यातील फुलवळसह परिसरात शुक्रवार (ता. सात) सायंकाळी अचानक वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह जोराचा पाऊस सुरु झाला.
नैसर्गीक वीज
नैसर्गीक वीज

फुलवळ ( जिल्हा नांदेड) : कंधार तालुक्यातील फुलवळसह परिसरात शुक्रवार (ता. सात) सायंकाळी अचानक वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह जोराचा पाऊस सुरु झाला. पानशेवडी शिवारातील (Kandhar panshevadi area) आपल्या शेतातील भूईमूग काढण्यासाठी गेलेला संतोप गोविंदराव जगताप ( वय ४० वर्षे ) हा शेतकरी सोबत आलेल्या इतर शेतमजूरांसह झाडाखाली थांबला (farmer stay in tree) असता अचानक झाडावर वीज कोसळली. ही वीज सदर शेतकऱ्याच्या डाव्या बरगडीला (farmer serias) स्पर्श करुन जमीनीत उतरली. परिणामी हा व्यक्ती गंभीर जखमी होऊन जागेवरच कोसळला. त्यामुळे 'काळ आला होता पण, वेळ आली नव्हती !' असेच म्हणावे लागेल. The time had come, but the time had not come! What is the case read ...?

सध्या उन्हाळी भूईमूग, उन्हाळी ज्वारी, हळद काढणे व वाळवणे चालू आहे. आणि तालुक्यात गेल्या काही दिवसापासून ढगाळ वातावरण दिसत आहे. परंतु उपरोक्त शेती कामासाठी शेतकऱ्यांना शेतात जाणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे पानशेवडी येथील संतोप गोविंदराव जगताप (वय ४० वर्षे) हा शेतकरी काही शेतमजूर सोबत घेऊन शुक्रवार त्यांच्या शेतातील भूईमूग काढत होते.

हेही वाचा - नांदेड : रोहीपिंपळगावात सामाजिक शांतता कायम राखा- प्रमोदकुमार शेवाळे

भूईमूग काढत असताना दुपारी दोन वाजता अचानक वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह जोराचा पाऊस सुरु झाला. विजेचा कडकडाट सुरु झाल्याने संतोष जगतापसह इतर सर्व शेतमजूर झाडाखाली थांबले असता अचानक झाडावर वीज कोसळून संतोष जगतापच्या डाव्या बरगडीला स्पर्श करुन जमीनीत उतरली. परिणामी हा व्यक्ती गंभीर जखमी होऊन जागेवरच कोसळला. सोबतचे सहकारी शेतमजूर बालंबाल बचावले. आणि सहकाऱ्यांनी उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणले.

हे वृत्त कळताच कंधारचे नायब तहसिलदार विजय चव्हाण यांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालय, कंधार येथे भेट देऊन कर्तव्यावर असलेले वैद्यकीय अधिक्षक डॉ. लोणीकर यांना त्या जखमी शेतकऱ्यावर योग्य तो उपचार करुन सहकार्य करण्यास सांगितले. तेव्हा डॉ. लोणीकर यांनी जखमी संतोष जगताप यांच्यावर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी नांदेड येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाला पाठवून दिले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com