esakal | नांदेड : येणाऱ्या काळात कुठल्याच निवडणूकीत एमआयएमशी युती नाही- प्रकाश आंबेडकर
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded News

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर पदवीधर मतदार संघाचे वंचित बहूजन आघाडीचे उमेदवार प्रा. नागोराव पांचाळ यांच्या प्रचारानिमित्ताने बुधवारी (ता.१८) प्रकाश आंबेडकर नांदेड दौऱ्यावर आले असता हॉटेल विसावा येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

नांदेड : येणाऱ्या काळात कुठल्याच निवडणूकीत एमआयएमशी युती नाही- प्रकाश आंबेडकर

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड -  येणाऱ्या काळात मजलिस इत्तेहादुल मुस्लीमीन (एमआयएम) शी कुठल्याच निवडणूकीसाठी युती राहणार नाही. असे स्पष्ट वक्तव्य वंचीत बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी नांदेड येथे बुधवारी (ता. १८) केला. 

पदवीधर मतदार संघाचे वंचित बहूजन आघाडीचे उमेदवार प्रा. नागोराव पांचाळ यांच्या प्रचारानिमित्ताने बुधवारी (ता.१८) प्रकाश आंबेडकर नांदेड दौऱ्यावर आले असता हॉटेल विसावा येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुढे बोलताना श्री. आंबेडकर म्हणाले की, २००४ मध्ये कॉग्रेस सत्तेवर असताना मला सर्वात पहिला इव्हीएमचा फटका बसला आहे.

हेही वाचा - नांदेड: वाळकीत ‘एक दुजे के लिए’ म्हणत प्रेमी युगलांची आत्महत्या

उल्हासनगर हुबेहुब वस्तू तयार करण्यासाठी प्रसिद्ध 

नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडियाची घोषणा दिली खरी, परंतु त्यासाठी विद्यार्थ्यांचे संशोधन कार्याचे वय ३० नको, २४ वर्षापर्यंत पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षण पद्धतीत बदल होणे गरजेचे आहे. तेव्हा कुठे त्याच्या संशोधनाचा सामान्य माणासासोतच या देशाला फायदा होईल, अन्यथा देशात मेक इन इंडिया ऐवजी जिथे लेबल बदलले की, हुबेहुब वस्तू तयार केल्या जातात ते उल्हासनगर होईल असे ते म्हणाले. 

हेही वाचले पाहिजे- नांदेड : वरसे धनेर कोट दवाळी, बापू तोन मेरा- बंजारा समाजात पारंपारिक पद्धतीने दिवाळी साजरी

राष्ट्रवादी, कॉँग्रेस, भाजप, शिवसेनेने विद्यार्थ्यांचा विकासाचा अजेंडा सांगावा 

राष्ट्रवादी, कॉँग्रेस, भाजप, शिवसेनेने अजेंडा नसलेले उमेदरावर उभे केले आहे. त्यांनी त्यांच्याकडील विद्यार्थ्यांचा विकासाचा अजेंडा सांगावा आम्हीही सांगू असे म्हणत त्यांनी चर्चेसाठी सर्व पक्षांना खुले आवाहनच दिले. वंचित हा राजकीय कार्यकर्ते तयार करण्याची फॅक्टरी आहे. जे सोबत आहेत त्यांचाच विचार होईल. आम्ही पक्ष सोडून गेलेल्यांचा पक्ष विचार करत नाही. सामान्य माणूस सत्तेच्या सिंहासनापर्यंत पोहचू नये म्हणून विरोधक फोडा फोडीचे राजकारण करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.  वेळी वंचितचे उमेदवार प्रा. नागोराव पांचाळ, फारुख आहेमद, शिवा नरंगले, प्रशांत इंगोले, श्‍याम कांबळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.〰