सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगीसाठी ही कागदपत्रे आवश्यक

प्रल्हाद कांबळे
Thursday, 13 August 2020

जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी आवाहन केले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाची रितसर परवानगी घेणे बंधनकारक आहे.

नांदेड  : सार्वजनिक गणेशोत्सव थोड्याच दिवसांवर येवून ठेपला असून हा उत्सवकोविड-19 च्या पार्श्वभुमिवर अधिकाधिक सुरक्षित व नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीने साजरा व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी आवाहन केले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाची रितसर परवानगी घेणे बंधनकारक आहे. यासाठी खालील कागदपत्रांची पूर्तता संबंधित गणेश मंडळांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयाला उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.

गणेश मंडळांना ही परवानगी ऑनलाईन पद्धती देण्यात येणार आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार नाहीत. ऑनलाईन नोंदणीसाठी https:charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करुन परवाना मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करणे आवश्यक आहे.

हेही वाचा -  नांदेडकरांनो कोरोनाला घाबरू नका, स्वतःहून स्वॅब द्या

सर्वांनी याची नोंद घेवून सहाकार्य करावे,

परवान्यासाठी मंडळातील सर्व सभासदांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, ईमेल आयडी, दुरध्वनी नंबर, जागा मालकाची संमती, पोलीस स्टेशनचे नाहरकत पत्र, गणेश मंडळ स्थापनेबाबत ठराव, मागील वर्षीचा जमा खर्चाचा अधिकृत लेखा परिक्षकार्मात हिशोब ही कागदपत्रे सादर करावी लागतील. सर्वांनी याची नोंद घेवून सहाकार्य करावे, असे आवाहन धर्मादाय उपआयुक्त किशोर मसने यांनी केले आहे.  

गणेश मंडळांना वर्गणी गोळा करण्याचा परवाना  

गणेश चतुर्थीसाठी गणेश मंडळांना वर्गणी गोळा करण्याचा परवाना येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्यावतीने दिनांक 13 ते 21 ऑगस्ट 2020 या कालावधीत शनिवार व रविवार व शासकीय सुट्टया वगळून कार्यालयीन वेळेत देण्यात येणार आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: These documents are required for permission to public Ganesh Mandals nanded news