Threats to Hindu leaders: पाकमधले सिमकार्ड मराठवाड्यातल्या मोबाईलमध्ये! काय आहे हिंदू नेत्यांच्या धमकीचे नांदेड कनेक्शन

Threats to Hindu leaders: आरोपीच्या 14 दिवसांच्या कोठडीची मागणी करताना, पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, रझा पाकिस्तानमध्ये सक्रिय असलेले सिमकार्ड असलेला सेलफोन वापरत होता आणि तो पाकिस्तान, नेपाळ आणि लाओसमधील लोकांच्या संपर्कात होता
Threats to Hindu leaders
Threats to Hindu leadersEsakal

आरोपीच्या 14 दिवसांच्या कोठडीची मागणी करताना, पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, रझा पाकिस्तानमध्ये सक्रिय असलेले सिमकार्ड असलेला सेलफोन वापरत होता आणि तो पाकिस्तान, नेपाळ आणि लाओसमधील लोकांच्या संपर्कात होता. निष्पाप तरुणांचे ब्रेनवॉश करण्यात आणि त्यांना भरती करण्याचा प्रयत्न तो करत असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपींना निधी कसा मिळाला आणि ते राणा तसेच भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना कसे ओळखतात, त्यांनी मेसेज आणि कॉलद्वारे धमकावले होते ते ही तपासले जाईल.

या प्रकरणात आतापर्यंतची ही तिसरी अटक आहे. गुन्हे शाखेने ४ मे रोजी सुरत येथून मोहम्मद सोहेल उर्फ ​​मौलवी अबुबकर तिमोल (२७) या मौलवीला अटक केली होती. सुरत जिल्ह्यातील कथोर येथील मदरशात शिकवणारा मौलवी १६ मेपर्यंत पोलिसांच्या ताब्यात आहे. यासंबधीचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

Threats to Hindu leaders
अमित शाहांच्या पंतप्रधानपदाची तारीख सांगितली पण मालीवाल यांचा प्रश्न आल्यावर मात्र... केजरीवालांच्या मदतीला धावले अखिलेश

गेल्या आठवड्यात या प्रकरणी शहनाज उर्फ ​​मोहम्मद अली मोहम्मद साबीर (25) याला बिहारमधील मुझफ्फरपूर येथून अटक करण्यात आली होती. शनिवारी त्याला सुरत येथे आणण्यात आले व दुसऱ्या दिवशी जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्याला २४ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौलवी शहनाजच्या नियमित संपर्कात होता आणि प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात द्वेष पसरवल्याबद्दल हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचला होता. दोन्ही आरोपींच्या चौकशीत रझाचे नाव पुढे आले, असे पोलिसांनी सांगितले

Threats to Hindu leaders
Murder Case : हुबळी पुन्हा हादरली! प्रेमाला नकार देणाऱ्या तरुणीचा घरात घुसून चाकूने भोसकून खून

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com