esakal | हदगावमधील दोन विविध घटनेत वीज पडून 3 गाई, 5 शेळ्यांचा मृत्यू

बोलून बातमी शोधा

Fire

या आगीच्या दोन घटनेत पाच लाख रुपयाचे नुकसान झाले.

हदगावमधील दोन विविध घटनेत वीज पडून 3 गाई, 5 शेळ्यांचा मृत्यू
sakal_logo
By
बंडू माटाळकर

निवघा बाजार (नांदेड ) : येथून जवळच असलेल्या मौजे धानोरा ( रुई ) ता. हदगाव येथील जनावरांच्या गोठयावर (ता. 30) एप्रिल शुक्रवार रोजी रात्री वीज पडल्याने गोठा जळून खाक झाला. या गोठ्यात बांधलेली तीन गाईचा होरपळून मृत्यू झाला तर दुसऱ्या घटनेत येळंब (ता. हदगाव) येथील स्पार्किंगमुळे गोठ्याला आग लागल्याने आत बांधलेल्या तीन शेळ्या व दोन शेळ्याच्या पिलांचा होरपळून मृत्यू झालाची घटना (ता. 30) एप्रिल शुक्रवार रोजी रात्री 8:30 वाजता घडली, या आगीच्या दोन घटनेत पाच लाख रुपयाचे नुकसान झाले.

या बाबत अधिक माहिती अशी की, परिसरात 30 एप्रिल शुक्रवार रोजी रात्री वादळी वाऱ्यासह तुरळक पाऊस झाला. या पावसात विजांचा कडकडाट मोठया प्रमाणावर होता. त्यातच धानोरा ( रुई ) ता. हदगाव येथील किसनराव नंदू शिंदे, रंगराव शिंदे, विजय शिंदे या तिघाचे गावा लगत जनावरांचा गोठा आहे. या गोठ्यात जनावरे बांधली होती. अचानक वीज कोसळल्याने गोठ्याला आग लागली आणि वादळी वारा असल्याने आगीने रौद्र रुप धारण केले. यामुळे तीन गोठे गळून खाक झाली. आतमध्ये बांधलेली तीन गाईचा होरपळून मृत्यू झाला तर दोन जनावरे जखमी झाली. गोठ्यात असलेली जनावरांचा चारा व पेरणीसाठी बियाणे म्हणून ठेवलेली सोयाबीन 'तुर' हरभरा पण जळून खाक झाला. अग्नीशमन दलाची गाडी आली होती, परंतू तो पर्यत गोठा जळून खाक झाला. घटनेचा पंचनामा तलाठी मुळेकर यांनी करुन अहवाल वरिष्ठांना पाठवला.

तर येळब (ता. हदगाव) येथील नामदेव माने व भिमराव माने यांचे गोठे गावा लगत आहेत. गोठ्यापासून गावाला वीजपुरवठा करणारी वीज वाहिनी आहे. वादळी वारा जोराचा सुटल्याने वीज वाहिनीचे तार ऐकमेकांना चिटकल्याने स्पार्किग होऊन आगीचे ज्वाळ गोठ्यावर पडल्याने गोठयाला आग लागली. या आगीत तीन शेळ्या व दोन शेळ्याची पिल्ल्यांचा होरपळून मृत्यू झाला. वादळवारा असल्याने आग आटोक्यात आली नाही. तलाठी भरणे यांनी घटनेचा पंचनामा करून अहवाला वरिष्ठांना पाठवण्यात आला.