तीन दिवसात १३३ कोरोनाबाधित रुग्ण वाढले, शुक्रवारी ४७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, ४० रुग्ण कोरोनामुक्त

file Photo
file Photo

नांदेड - जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांच्या टक्केवारीत वाढ होताना दिसत आहेत. दुसरीकडे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची आकडेवारी काही प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. मागील तीन दिवसात जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत १३३ रुग्णांची भर पडली आहे.


गुरुवारी (ता. २८) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅब पैकी शुक्रवारी (ता.२९) एक हजार ५५० अहवाल प्राप्त झाले. यामध्ये एक हजार ४८० निगेटिव्ह, ४८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २२ हजार ४६३ इतकी झाली आहे.

हेही वाचा- अरे वा...जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला रुग्णांसमवेत भोजनाचा आस्वाद

४७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालात नांदेड वाघाळा महापालिकेंतर्गत - २३, नांदेड ग्रामीण - दोन, अर्धापूर - दोन, लोहा- तीन, मुखेड - दोन, माहूर - एक, भोकर - एक, कंधार - तीन, मुदखेड- एक, उमरी- एक, देगलूर - चार, किनवट - दोन, उमरखेड - दोन असे ४७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. गंभीर रुग्णांपैकी शुक्रवारी श्री गुरुगोविंदसिंघ स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालायात उपचार सुरु असलेल्या सन्मित्र नगरातील एका महिलेचा (वय ४८) उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या मुळे जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा एकने वाढून ५४५ वर पोहचला आहे.

हेही वाचा- नांदेड: अज्ञात वाहनाच्या धडकेत सहशिक्षकाचा जागीच मृत्यू ​

३९७ स्वॅबची तपासणी सुरु

जिल्हा शासकीय रुग्णालय - एक, महापालिकेंतर्गत गृह विलगीकरणातील - ३०, हदगाव - दोन आणि खासगी रुग्णालयातील सात असे ४० रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातुन सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या २१ हजार ३४५ इतकी झाली आहे. सध्या ३२१ बाधितावर जिल्हा भरातील शासकीय व निमशासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यापैकी नऊ पॉझिटिव्ह रुग्णांची प्रकृती अतिगंभीर स्वरुपाची आहे. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत ३९७ स्वॅबची तपासणी सुरु होती.

नांदेड कोरोना मीटर ः

एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण - २२ हजार ४६३
एकूण कोरोनामुक्त रुग्ण - २१ हजार ३५४
एकूण मृत्यू - ५८५
शुक्रवारी पॉझिटिव्ह - ४७
शुक्रवारी कोरोनामुक्त रुग्ण - ४०
शुक्रवारी मृत्यू - एक
उपचार सुरु- ३२१
गंभीर रुग्ण- नऊ
स्वॅब तपासणी सुरु- ३९७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com