Nanded Crime : ‘शार्पशूटर’सह तिघांना पोलिस कोठडी; आरोपींची संख्या झाली आठ
Police Custody : नांदेडच्या शहिदपुरा गोळीबार प्रकरणात पंजाब येथून आणलेल्या मुख्य शार्पशूटरसह तिघांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना १० मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
नांदेड : नांदेड शहरातील शहिदपुरा भागातील गोळीबार प्रकरणात पंजाबच्या स्पेशल सेलने अटक केलेल्या मुख्य शार्पशुटरसह अन्य एकाला नांदेडच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पंजाब येथून नांदेडला आणले.