esakal | नांदेडमध्ये आगीत तीन दुकाने जळून खाक; जवळपास पंधरा लाखाचे नुकसान 

बोलून बातमी शोधा

file photo}

या जळीतप्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. यात जवळपास पंधरा लाखाची नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

नांदेडमध्ये आगीत तीन दुकाने जळून खाक; जवळपास पंधरा लाखाचे नुकसान 
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : शहराला लागूनच असलेल्या वाघी रस्त्यावरील खुशी मार्केटमध्ये लागलेल्या आगीत तीन दुकानांची राखरांगोळी झाली. ही घटना मंगळवार (ता. दोन) मार्चच्या पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. या जळीतप्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. यात जवळपास पंधरा लाखाची नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

वाघी रस्त्यावर असलेल्या खुशी मार्केटमध्ये लागलेल्या आगीत तीन दुकाने जळून खाक झाली असून जवळपास पंधरा लाखाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. अग्निशमन पथकाने परिश्रम घेत या आगीवर नियंत्रण मिळविले. सकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान वाघी रस्त्यावर खुशी मार्केटमध्ये अचानक धूर आणि आग दिसू लागली. या मार्केटमध्ये जवळपास पंधरा दुकाने आहेत. याची सुरुवात मोहम्मद फारुक यांच्या सेवा गादी घरापासून झाली. त्यानंतर शेख फैय्याज यांच्या फर्निचर दुकानाला व पुढे  मोहम्मद इलियास यांच्या हिंदुस्तान फॅब्रिकेशन दुकानापर्यंत पोहोचली.

या आगीची माहिती उपस्थित लोकांनी अग्निशमन दलाला फोनवरुन माहिती दिली. त्यावेळी अग्निशमन दलाचे तीन बंब तिथे पोहोचले. त्यांनी आग आटोक्यात आणली. वजिराबाद पोलिस उपनिरीक्षक सुरजितसिंग माळी आणि पोलिस हवालदार श्री आडे यांच्यासह अनेक पोलिसांनी घटनास्थळ गाठले. अग्निशमन दलाच्या मेहनतीमुळे ही आग आटोक्यात आली. या आगीमध्ये फर्निचर दुकानाचे दहा लाखांचे नुकसान झाले असून गादी घराचे तीन लाखाचे आणि फॅब्रिकेशनचे दोन लाख असे एकूण जवळपास पंधरा लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज दुकान मालकांनी बोलून दाखवला आहे. प्राथमिक दृष्ट्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली असेल असे सांगण्यात आले.