
नांदेड : स्थानिक बाजारात तुरीला सरासरी सहा हजारपर्यंत दर मिळत असल्याने किमान हमी दरानुसार तूर विक्रीसाठी नोंदणी मंदावली आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील तीन यंत्रणांच्या ३० केंद्रावर तीन हजार ५३८ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयातून मिळाली.
शेतकऱ्यांना केंद्राच्या किमान हमी दरानुसार प्रतिक्विंटल सहा हजार रुपये दर मिळावा, यासाठी नाफेडच्या माध्यमातून जिल्ह्यात दि. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन तसेच महाफार्मर प्रोड्यूसर कंपनी या तीन यंत्रणेच्या माध्यमातून २८ ठिकाणी खरेदी केंद्र सुरू झाली आहेत. डिसेंबर महिन्याच्या २८ तारखेपासून जिल्ह्यात ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झाली. परंतु आजपर्यंत या ३० खरेदी केंद्रावर तीन हजार ५३८ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयातून मिळाली. सध्या नांदेड बाजार समितीमध्ये तसेच खेडा खरेदीत तुरीला सरासरी पाच हजार सातशे ते सहा हजार रुपये दर मिळत आहेत.
हेही वाचा - विदेशी व परराज्यातील आरोपी नांदेड पोलिसांच्या जाळ्यात; शंकर नागरी बँक १४ कोटी अपहार प्रकरण
तीन हजार ५३८ जनांची नोंदणी ः
दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या नऊ खरेदी केंद्रावर दोन हजार १७७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. विदर्भ विदर्भ को-ऑपरेटिव्ह फेडरेशनच्या चार खरेदी केंद्रावर ९०४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तर महाएफपीसी कंपनीच्या १७ खरेदी केंद्रावर ४५७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण तीन हजार ५३८ शेतकऱ्यांनी नोंदणी केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयातून मिळाली.
नांदेडला दरात तेजी ः
नांदेड बाजार समितीच्या नवा मोंढा बाजारात सोमवारी (ता. २५) ८४ क्विंटल आवक झाली. यास कमाल सहा हजार दोनशे, किमान पाच हजार आठशे तर सरासरी सहा हजार रुपये दर मिळला. बुधवारी (ता. २७) १०४ क्विंटल आवक झाली. यास कमाल सहा हजार ८५, किमान पाच हजार५६१ तर सरासरी पाच हजार ९०० दर मिळाला. गुरुवारी (ता. २८) ६७ क्विंटलची आवक झाली. यास कमाल सहा हजार ५१, किमान पाच हजार २५० तर सरासरी पाच हजार ७७५ रुपये दर मिळाल्याची माहिती बाजार समितीचे रविकुमार कल्याणकर यांनी दिली.
संपादन- प्रल्हाद कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.