esakal | वसमतमध्ये १०० बेडचे विनामुल्य कोविड सेंटर चालवणार; कन्हैया बाहेतीनी मागितली परवानगी...

बोलून बातमी शोधा

कोविड सेंटरसाठी

वसमतमध्ये १०० बेडचे विनामुल्य कोविड सेंटर चालवणार; कन्हैया बाहेतीनी मागितली परवानगी...

sakal_logo
By
संजय बर्दापूरे

वसमत ( जिल्हा हिंगोली ) : शहरातील कारखाना रोडवरील मयुर मंगल कार्यालयाची जागा अधिग्रहित करुन दिल्यास सर्वसामान्य रुग्णांसाठी स्वखर्चातून एक महिना १०० बेडचे कोविड सेंटर चालविणार असून त्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा युवा सेनेचे कन्हैया बाहेती यांनी तहसिलदार यांचेकडे गुरुवारी (ता. २९) केली आहे. यासाठी त्यांनी सर्व तयारी केली असून परवानगी मिळताच हे कोविड सेंटर सुरु होणार.

कुठलेही मोठे राजकीय पद नसताना कन्हैया बाहेती हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कामात अग्रेसर आहेत. विशेष करुन रुग्ण सेवेत ते नेहमीच कार्यरत असतात. त्यांची शहर व तालुक्यातील रुग्णांसाठी स्वखर्चातून रुग्णवाहिका सुरु आहे. तसेच मागील वर्षी कोविडचा संसर्ग सुरु झाल्यानंतर लाँकडाऊनमध्ये गोरगरीबांना राशन किटचे मोठ्या प्रमाणात वाटप केले होते.

हेही वाचा - नांदेड शहराचे विद्रुपीकरण खपवून घेतल्या जाणार नाही- निलेश मोरे

मागील दोन महिन्यांपासून कोविडची दुसरी लाट सुरु झाल्यानंतर अनेकांना कोरोना संसर्ग सुरु झाला. परिणामी शासकिय कोविड सेंटरचे बेडवर वैद्यकीय सेवा अपुरी पडू लागली. तर सर्वसामान्य रुग्णांना खाजगी कोविड सेंटरचा आवाढव्य खर्च परवडत नसल्याने उपचाराअभावी परवड सुरु झाली. कन्हैया बाहेती यांनी यावेळीही पुढाकार घेतला.

जिथे राजकीय गब्बर पदाधिकारी यांची सामाजिक सेवेत अनास्थाचे दर्शन होत असतानाच श्री बाहेती यांनी थेट तहसीलदार यांना लेखी निवेदन देऊन स्वखर्चातून एक महिन्यासाठी शंभर बेडचे कोविड सेंटर सुरु करण्याची परवानगी मागीतली. परवानगी दिल्यास या कोविड सेंटरमध्ये दाखल रुग्णांना डॉक्टर तपासणी, औषधोपचार यासह चहापाणी, अल्पोपहार, भोजन आदी अंतर्गत व्यवस्था देणार असल्याचे कन्हैया बाहेती यांनी सांगितले.

संपादन- प्रल्हाद कांबळे