छत्रपती शिवरायांना अभिप्रेत समाज उपयोगी काम आजच्या युवकांनी करावे- निसार तांबोळी

file photo
file photo

नांदेड : रयतेच्या हितासाठी लोककल्याणकारी कामे करुन स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिप्रेत असलेली कामे आजच्या युवकांनी आणि नागरिकांनी करुन समाजाला चांगल्या, योग्य दिशेने वाटचाल करण्यास मदत प्रवृत्त करावं, जेणेकरुन आजच्या युगात चांगली वाटचाल होईल, असे प्रतिपादन नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी शिवजयंती निमित्ताने नवामोंढा नांदेड येथे सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित प्रबोधनात्मक व्याख्यानाच्या कार्यक्रमात उद्‌घाटकीय भाषणात बोलताना आपले मत व्यक्त केले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. उद्धव भोसले, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर मोहिनी येवनकर, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, सामाजिक कार्यकर्त्या आशा शामसुंदर शिंदे, पंजाब डक पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, सहायक आयुक्त एकनाथ पावडे, बाबा हरीसिंगजी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, जुक्ताचे डी. बी. जांभरुणकर, छावा क्रांतीवीर संघटनेचे राजेश मोरे ,कार्यकारी अभियंता इंजि. तानाजी हुसेकर, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे माधव देवसरकर, विवेक पाटील, नगरसेवक उद्योजक बालाजी पाटील जाधव, मेडिकल कौन्सिलचे सदस्य डॉ. संजय कदम, आय.एम.ए.चे अध्यक्ष डॉ. सुरेश कदम, जिजाऊ ब्रिगेडच्या डॉ. विद्या पाटील, मीनाक्षी जाधव पाटील, नगरसेवक बापूराव गजभारे, अलीमभाई, संतोष हंबर्डे, राजू पारसेवार, निमाचे डॉ. अविनाश हंबर्डे, नरेंद्र महाराज संप्रदाय समितीचे विश्वनाथ इंगळे पाटील, हॅप्पी क्लबचे सदस्य यांच्यासह सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष डॉ. अंकुश देवसरकर, स्वागताध्यक्ष धनंजय पाटील, भागवत देवसरकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

पुढे बोलताना निसार तांबोळी यांनी गेल्या तीन दिवसांपासून सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या माध्यमातून होत असलेल्या सर्वच कार्यक्रमाचं कौतुक करत वर्षभर असे कार्यक्रम राबवत समाजाला वेगळी दिशा देण्याचे काम समितीने करावे, असे आवाहन करत समितीच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
यावेळी हवामान तज्ज्ञ पंजाब डक यांनी उपस्थित मान्यवरांना शेतकऱ्यांच्या हवामाना बदलविषयी पिकांवर होणारे परिणाम याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले. आ. मोहन हंबर्डे यांनी अध्यक्षीय भाषणामधून शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे वर्णन करत, नांदेडच्या इतिहासात पहिल्यांदाच छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरद्वारे झालेल्या पुष्पवृष्टीचे विशेष कौतुक केले. यापुढील काळात आगळेवेगळे समाज उपयोगी कामे करावी, असे समितीला आवाहन केले. यावेळी प्रास्ताविकामध्ये सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. अंकुश देवसरकर यांनी मागील तीन दिवसांपासून केलेल्या कामाची माहिती उपस्थितांना सांगितली. कार्यक्रमाला शासनाच्या कोरोना नियमाचे पालन करत सर्वांना मास्क व सनिटायझरचे वाटप करण्यात आले होते.

यावेळी सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने नांदेडमध्ये कोरोनाच्या काळात विशेष कामगिरी करणाऱ्या कोरोना योद्धांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये नांदेड भूषण बाबा बलविंदरसिंघजी, कुलगुरू डॉ. उद्धवजी भोसले, अधिष्ठाता डॉ. सुधिर देशमुख, पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, कृषी अधीक्षक अधिकारी रविशंकर चलवदे, पद्मजा सिटीचे संचालक बालाजी जाधव, संतोष हंबर्डे, उद्योजक राजू पारसेवार, हॅपी क्लब सामाजिक कार्यकर्ते तथा नगरसेवक अलीमभाई, बापूराव गजभारे, उद्योजक सुनील इंगळे, भगवती हॉस्पिटलचे संचालक डॉ. राहुल देशमुख यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन सर्वांच्या कार्याच्या संमान गौरव यावेळी करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com