पर्यटन दिन विशेष : नांदेड जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पर्यटकांच्या प्रतिक्षेत

Nanded News
Nanded News

नांदेड :  मान्सूनपासूनच पर्यटनाचा हंगाम सुरु होतो. मात्र कोरोनामुळे राज्यभरातील प्रेक्षणीय तसेच धार्मिक स्थळे बंद असल्याने ही स्थळे अद्यापही ओस पडलेलीच आहे. कोरोनामुळे ऐन पर्यटन हंगामात अर्थचक्र रुतल्याने या व्यवसायाला कोट्यवधींचा फटका बसला असून पर्यटकांचाही हिरमोड झाला आहे.

पहिला पाऊस पडला की निसर्गप्रेमींची पावले पर्यटनस्थळांकडे वळतात. हिरवा निसर्ग पर्यटकांना श्रावण महिन्यामध्ये खुणावू लागतो. देश-विदेशातील पर्यटनाचे बेत देखील आखले जातात. मात्र, यंदा सर्वच नियोजनावर पाणी फिरले आहे. कोरोनामुळे शासनाने खबरदारी म्हणून पर्यटनस्थळांना परवानगी दिलेली नाही. त्यामुळे यंदा पर्यटनाचे बेत रद्द करून घरातच बसण्याची वेळ हौशी पर्यटकांवर आली आहे.

श्रावणात देशांतर्गत पर्यटन तसेच पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा येथे पावसाळी पर्यटनाचा हंगाम असतो. मात्र, यंदा कोरोनामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. सद्य परिस्थिती बघता अजून दीड वर्ष तरी पर्यटकांना प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 


 
नांदेड जिल्ह्यातील प्रमुख धार्मिक व पर्यटनस्थळे
तख्त सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब
 : नांदेडचा मुख्य गुरुद्वारा असून सिखांच्या अधिपत्याखालील पाच उच्च जागांपैक एक आहे. त्यामुळे देशभरातून भाविक येथे दर्शनासाठी येतात.
श्रीक्षेत्र माहूरगड : महाराष्ट्रातील एक शक्तिपीठ. रेणुका देवीचे मंदीर असून ते नैसर्गिक सौंदर्यात डोंगरावर वसलेले आहे. तसेच याच परिसरात असलेली माहूरची पांडव लेणी आणि वझरा शेख फरीद धबधबाही माहूरला येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षण असते.
भुईकोट किल्ला (कंधार) : हा किल्ला १५ एकरात असून त्याच्या भोवती खंदक आहे. राष्ट्रकुल घराण्यात हा किल्ला राजधानी होता. किल्ल्यावर एक टेहळणी बुरुज असून अनेक तोफा अजूनही चांगल्या स्थितीत बघायला मिळतात.

कंधारचा दर्गाह : मध्ययुगीन अवशेषांमध्ये सुफी संत हाजी सरवर महदूम सैय्या यांचा दर्गा मध्ययुगीन वास्तु परंपरा आजही जोपासून आहे. 
महाविहार बावरीनगर दाभड (ता. अर्धापूर) : शासनाने तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केले असून, दरवर्षी पौष पौर्णिमेला अखिल भारतीय धम्म परिषदेचे आयोजन होते. त्याला जगभरातून लाखो भाविकांची उपस्थिती असते.
होट्टल (ता.देगलूर) : येथे चालुक्यकालीन मंदिरे व शिल्पस्थापत्य अवशेष आहेत. त्यामध्ये सिद्धेश्वर, परमेश्वर, महादेव, सोमेश्वर, रोकबेश्वर, त्रैपुरुषदेव या मंदिरांचा समावेश आहे. चालुक्य काळातील मंदिरस्थापत्याचा अप्रतिम अविष्कार येथे पहायला मिळतो. देगलूरपासून आठ किलोमिटर अंतरावर होट्टल आहे.                      सहस्त्रकुंड धबधबा :  पैनगंगा नदीवरील हा धबधबा पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे. नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्याच्या हद्दीमध्ये हा धबधबा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com