ऊसतोड मजुरांवर काळाचा घाला ; दोन ठार

ऊसतोड मजुरांवर काळाचा घाला ; दोन ठार


मुक्रमाबाद, (ता.मुखेड, जि. नांदेड) ः महाराष्ट्रातील ऊसतोड कामगार हे कर्नाटक राज्यात ऊसतोडीच्या कामासाठी जात असताना मुखेड तालुक्यातील हातराळ येथे ट्रॅक्टर उलटून दोघांचा मृत्यू झाला असून ही दुर्देवी घटना शनिवारी (ता.सात) रोजी रात्री साडे दहा वाजता घडली असून ऐन दिवाळीच्या तोंडावर ही घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा ऊसतोड मजूरांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा टाकला आहे.


कोरोनाच्या या महामारीमुळे अनेकांचा रोजगार हिरावला. त्यामुळे अनेकांनी मिळेल ती कामे करून आपली उपजिविका चालविण्यासाठी धडपडत आहेत. अशाच नांदेड जिल्ह्यातील मारतळा व इतर ठिकाणचे ऊस तोड मजूर हे आपल्या कुटुंबाचा उदारनिर्वाह चालविण्यासाठी कर्नाटक राज्यातील भालकी येथील सारख कारखाण्यावर (एम.एच.२६-बी.सी. ९२४५) या ट्रॅक्टरने जात होते. पण रात्रीच्या प्रवासात मुखेड तालुक्यातील हातराळ येथील महामार्गावर असलेल्या उताराचा अंदाज ट्रॅक्टर चालकास आला नसल्यामुळे भरधाव वेगात असलेल्या ट्रॅक्टरचे हेड काही समजण्याच्या आतच पलटी खाऊन ट्रॅक्टर चालक सुरेश पवार (वय २८) व त्याच्या शेजारी बसलेला साहेबराव गायकवाड दोघेही राहणार मारतळा (ता. लोहा) या दोघांचा ट्रॅक्टरच्या हेडखाली दबून जाग्यावरच मृत्यू झाला. तर हेड पलटी खाताच ट्रॉलीमध्ये असणारे इतर मजूर हे, उड्या मारल्यामुळे पुढील अनर्थ टळला. दापका गुंडोपंत येथील सरपंच ज्ञानेश्वर पाटील दापकेकर यांनी माणुसकीचे दर्शन दाखवत या अपघातात मृत्यू पावलेल्या मृतदेहाला बाहेर काढण्यासाठी जेसीबी व क्रेनची सोय करून आत दबलेले मृतदेह बाहेर काढले. या अपघातातून बचावलेल्या व इतर मजूरांची सर्व सोय केली. 

घरात घुसून सोन्याचे दागिने पळवले 
फुलेनगर (ता. कंधार) येथे पाच ते सहा नोव्हेंबरच्या दरम्यान चोरट्यांनी घराचा कोंडा तोडून सोन्याचे दागिने चोरून नेले. चांदोबा धोंडिबा कांबळे (रा.फुलेनगर) यांनी कंधार पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले की, मी व माझे कुटुंबिया कामानिमित्त बाहेरगावी गेलो होतो. दरम्यान चोरट्यांनी आमच्या घरावर पआळत ठेवून घराचे कडी कोंडा तोडून आत प्रवेश केला. कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने (किंमत एक लाख सात हजार २६७ रुपये) चोरट्यांनी चोरून नेले आहे. चांदोबा कांबळे यांच्या तक्रारीवरून कंधार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद असून, पोलिस उपनिरीक्षक श्री. केंद्रे पुढील तपास करत आहेत. 

लोहा येथे दुचाकीची चोरी 
गोविंद दुलबा वाकडे यांच्या प्रियदर्शननीनगर लोहा येथील घरासमोर लावलेली दुचाकी (एमएच-२६, बीएस-६१४३) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. गोविंद वाकडे यांच्या तक्रारीवरून लोहा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्यात आला असून, श्री. कदम तपास करत आहे. 

पैशाच्या कारणावरून मारहाण 
लालवाडी चौरस्ता येथे मुजीब मजहर पठाण (वय ३२) यांना रेतीचे राहिलेले ४०० रुपये देण्याच्या बहाण्याने आरोपींनी मरहाण केली. महेफुज इलेक्ट्रीक दुकानासमोर रस्त्यावर ही मारहाण झाली. यामध्ये मुजीब यांना जबर मारहाण केल्याने उजव्या हाताची करंगळी फॅक्चर झाली. मुजीब पठाण यांच्या तक्रारीनुसार शिवाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com