पाढंऱ्या सोन्याची व्यापाऱ्यांनी केली चांदी!

bhokar.jpg
bhokar.jpg


भोकर, (जि. नांदेड) ः तालुक्यात कापूस खरेदीसाठी शासनाने स्वतंत्र केंद्र सुरू केली आहेत. दरम्यान कोरोनामुळे केंद्र बंद झाली. आता थोडी ढील दिल्याने पुन्हा शहरातील काॅटन मील सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या नावावर चतूर व्यापारी केंद्रावरील संबंधितांना हाताशी धरून पांढऱ्या सोन्याची चांदी करीत आहेत. याची दखल घेऊन गुरुवारी (ता. ११) येथील महसूल विभागाने सखोल चौकशी केली आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे समजते.


तालुक्यातील खरीप हंगामात नगदी पीक कापूस आणि सोयाबीन पाठोपाठ आता हळद लागवडीचे प्रमाण वाढले आहे. कापसाला पांढर सोन म्हणून ओळखल्या जाते. मागील अनेक दिवसांपासून बाजार पेठेत मालाला हमीभाव मिळत नाही. परिणामी शेतकरी नेहमीच आर्थिक टंचाईचा सामना करतो आहे. कृषी प्रधान देशात बळिराजाची झोळी नेहमीच रिकामी असते. शासनही केवळ नाममात्र डोळ्यातील आसवे पुसण्याचे काम करते आहे. शेतकरी हा देशाचा आर्थिक कणा आहे, याकडे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. या वर्षी कापूस पीकांचे समाधानकारक ऊत्पन्न झाले आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर कापसाचा भाव ठरला जातो त्यानंतर भावात चढ-उतार होत राहते. 


शेतकरीही संभ्रमात
भाव स्थिर राहात नसल्याने शेतकरीही संभ्रमात राहतो आहे. कापूस खरेदी केंद्रांवर आवक वाढली की अचानक कोरोना विषाणूंमुळे देशात लाॅकडाउन करण्यात आला. खरीदी मिल बंद झाल्याने शेतकरी हैराण झाला आहे. आता कुठे संचारबंदी शिथिल केल्याने व्यवहार सुरळीत झाले आहेत. शहरातील दोन काॅटन मिलवर हमी दरानुसार सीसीआय, पणन व खासगी व्यापाऱ्यांनी कापूस खरेदी सुरू केली आहे. शेतकऱ्यांनी केंद्रावर गर्दी करू नये म्हणून आॅनलाइन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणी येथील उपजिल्हाधिकारी पवन चांडक व तहसीलदार भरत सूर्यवंशी यांना मिळताच बुधवारी दोन्ही कापूस खरेदी मिलला भेटून सखोल चौकशी केली आहे. जे व्यापारी असा व्यवसाय करीत आहेत हे सिद्ध होताच त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार, यात कुणाचीही गय केली जाणार नाही, अशी माहिती महसूल विभागाने दिली आहे.

कारवाई केली जाणार
सध्या शहरातील दोन काॅटन मिलवर कापूस खरेदी सुरू आहे. उपजिल्हाधिकारी श्री. चांडक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बुधवारी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आहे. किती शेतकरी कापूस विक्रीसाठी आणला आहे याची शहानिशा करण्यासाठी संबंधित तलाठ्यांना आदेश दिले आहेत. पूर्ण अहवाल प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांऐवजी जर कोणी विक्री करत असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे तहसीलदार भरत सूर्यवंशी यांनी सांगितले.

सर्व शेतकऱ्यांचा कापूस घेणार
लाॅकडाउनमुळे आम्ही खरेदी बंद केली होती. आता आॅनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा कापूस खरेदी सुरू आहे. काही व्यापारी येत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित केद्रांवर चौकशीचे आदेश दिले आहेत. माझ्याकडे जेवढी नोंदणी केली आहे त्या सर्व शेतकऱ्यांचा कापूस घेणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये. असे देवानंद धूत, व्यंकटेश काटन मिल प्रमुख यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com