car burnt
sakal
लोहा - चालकाचे नियंत्रण सुटून दुभाजकावर जोराने आदळलेल्या भरधाव कार (एमएच २६ एके ६४४४) ने अचानक पेट घेतल्याने होरपळून एका जणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता. २५) सायंकाळी सातच्या सुमारास नांदेड–लातूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वर सोनखेडपासून तीन किलोमीटर अंतरावर वंदना पेट्रोल पंपाजवळ घडली.