esakal | नांदेड : कॉ. रविंद्र जाधव यांच्या जिद्दीमुळेच होतेय ख्रिश्चन दफनभूमिचा कायापालट 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

राहिलेल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी 26 नोव्हेंबरच्या सीटूच्या आंदोलनात सामील होण्याचे आवाहन

नांदेड : कॉ. रविंद्र जाधव यांच्या जिद्दीमुळेच होतेय ख्रिश्चन दफनभूमिचा कायापालट 

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड - सीटू आणि मा.क.प.च्या यशस्वी प्रयत्नाने नांदेड येथील एकमेव ख्रिश्चन दफन भूमी चे गंभीर प्रश्न महापालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने आणि जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांच्या निदर्शनास आणून देत आतापर्यंत चार वेळा आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी आणि आयुक्तांनी संबंधित विभागांना कार्य तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत परंतु बांधकाम, विद्युत, पाणीपुरवठा व वित्त विभागातील काही कामचुकार अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक काम पूर्ण करण्यास विलंब केला आहे.

साफसफाईचे काम ऐंशी टक्के पूर्ण झाले असून ते पूर्ण करावे तसेच दफनभूमितील अंतर्गत रस्ते, विद्युत पुरवठा, स्ट्रीट लाईट, पाणी पुरवठा व लोकसंख्येच्या आधारावर दहा एकर जमीन ख्रिश्चन दफनभूमिसाठी शासनाने महापालिका हद्दीत द्यावी ह्या मुख्य व कळीच्या मागण्या अपूर्णच आहेत.

हेही वाचा -  परभणी- सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने ‘कही खुशी कही गम

मागील अनेक आंदोलनात ह्या मागण्या सातत्याने केल्या असून वरिष्ठांच्या आदेशाला कनिष्ठांनी केराची टोपली दाखाविली आहे. त्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच पुढील महिन्यात 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस नाताळ सन असल्यामुळे दफन भूमी येथे सर्व सुविधा पुरवाव्यात या साठी 26 नोव्हेंबर रोजी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सीटूच्या देशव्यापी आंदोलनात मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन कॉ. रविंद्र जाधव यांनी केले आहे.

असंघटीत कामगार संघटनेचे गांधीनगर युनिट अध्यक्ष कॉ. रविंद्र जाधव यांच्या जिद्दीमुळेच ख्रिश्चन दफनभूमीचा कायापालट होत असून त्यांच्या कार्याबद्दल सीटू च्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. ता. 26 नोव्हेंबर चे देशव्यापी आंदोलन यशस्वी करण्यासाठी सर्व कामगार कर्मचाऱ्यांनी सामील व्हावे असे आवाहन सीटूच्या वतीने करण्यात येत आहे.