महावितरणच्या नांदेड परिमंडळात वृक्षारोपन

फोटो
फोटो

नांदेड : महावितरणने वृक्षसंवर्धनाच्या अनुशंगाने महावनीकरण हा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. वृक्षलागवड व संवर्धनाची मोहीम यशश्वी करण्याच्या हेतूने औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सह व्यवस्थापकीय संचालक सुनिल चव्हाण यांनी पुढाकार घेवून सुरू केलेल्या मोहीमेस नांदेड परिमंडळात आज वृक्ष लागवड करून उत्साहात सुरवात करण्यात आली.

महावनीकरन मोहिमेचे औचित्यसाधून महावितरणच्या नांदेड परिमंडळाने परिमंडळ, मंडळ आणि विभागीय कार्यालये तसेच उपकेंद्राच्या परिसरामध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपणाचा निर्धार केला असून त्याची सुरवात नांदेड परिमंडळ कार्यालयाच्या परिसरात मुख्य अभियंता डी. व्ही. पडळकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून सुरवात करण्यात आली.  
                                                    
परिमंडळामध्ये एक कर्मचारी दोन वृक्ष याप्रमाणे वृक्षांची लागवड

पर्यावरणाच्या असंतूलनामुळे होणाऱ्या परिणामांची तिव्रता कमी करण्यासाठी महावितरणने केलेल्या आवाहनानुसार नांदेड परिमंडळामध्ये एक कर्मचारी दोन वृक्ष याप्रमाणे वृक्षांची लागवड करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार मुख्य अभियंता डी. व्ही. पडळकर यांनी परिमंडळस्तरावर बैठका घेवून वृक्ष लागवडीची संपुर्ण तयारी करून मंडळ निहाय उदिष्ट दिले आहे.

विभागास वृक्षांची रोपे उपलब्ध करून देण्याची महत्वपुर्ण भूमिका बजावत 

परिमंडळाच्या स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता एस. के. भिसे यांनी वन अधिकारी आणि सर्व विभागातील कार्यकारी अभियंते यांच्याशी समन्वय साधून प्रत्येक विभागास वृक्षांची रोपे उपलब्ध करून देण्याची महत्वपुर्ण भूमिका बजावत आहेत. आजपासून सुरू झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी कार्यकारी अभियंता भूषण पहूरकर, मानव संसाधन विभागाचे सहाय्यक व्यवस्थापक सुशिल पावसकर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी महेंद्र बागूल, ॲड. शैलेंद्र पाटील, लेखा विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक मधूर सावंतराव, उपव्यवस्थापक मासं सुदर्शन कालेवाड अतिरिक्त उपकार्यकारी अभियंता पी. आर. बोडके, अभियंता श्री राठोड, श्री मुदलीराज त्याचबरोबर परिमंडळातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

उर्जा विभागाच्या सहव्यवस्थापकीय संचालकांना अधिकार

गेल्या सरकारच्या काळात पांढरे हत्ती ठरलेल्या महावितरणचे प्रादेशिक कार्यालय असलेले सहव्यवस्थापकीय संचालकांचे कार्यालयालयाचे बळकटीकरण करण्यासाठी त्यांना अधिकार बहाल करण्याच्या निर्णयाप्रत ऊर्जामंत्री आले आहेत. या संदर्भात सादर करण्यात आलेल्या सादरीतरणानंतर डॉ. नितीन राऊत यांनी या संदर्भात माहीती दिली. असे झाले तर महावितरणच्या कामाला गती येणार असून राज्यातील वीज ग्राहकांना याचा फायदा होणार. 

प्रकल्पांचे बारकाईने निरीक्षण व प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न

गुरूवारी आयोजित सादरीकरणामध्ये औरंगाबाद प्रादेशिक विभागामधील आयपीडीएस, डीडीयूजीजेवाय, आरएफ मीटर बदली व सौर कृषीपंप या योजनांच्या प्रमाण आणि वेळ मर्यादेच्या विस्ताराशी संबंधित सर्व अधिकार, प्रकल्पांचे बारकाईने निरीक्षण व प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यासाठी सहव्यवस्थापकीय संचालकांना व प्रादेशिक संचालकांना अधिकार प्रदान करणे आवश्यक असल्याची विनंती औरंगाबाद श्री सुनिल चव्हाण सहव्यवस्थापकीय संचालक यांनी सदर बैठकीत केली.

प्रादेशिक कार्यालये पांढरे हत्ती ठरल्याची चर्चा 

सन २०१६ साली गांधी जयंतीनिमित्त राज्यात चार प्रादेशिक कार्यालयाची पुणे, औरंगाबाद, नागपूर व कल्याण येथे मोठा गाजावाजा करून स्थापना करण्यात आली. यातील कल्याण व औरंगाबाद येथे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून वरिष्ठ आयएएस अधिकारी यांची नेमणूक तर पुणे व नागपूर येथे प्रादेशिक संचालक हे बिगर आयएएस अधिकारी यांची नेमणुक करण्यात आली होती. परंतु त्यांना कोणतेच अधिकार नसल्याने योजनांची अंमलबजावणी करणे अवघड झाल्याने ही प्रादेशिक कार्यालये पांढरे हत्ती ठरल्याची चर्चा यावेळी करण्यात आली..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com