esakal | ट्रक चालकाला लुटले, नांदेडची वाटचाल...

बोलून बातमी शोधा

file photo

विष्णुपूरी, असर्जन, काळेश्‍वर, विद्यापीठ परिसर, लातूर फाटा, शिवरोड, बोंढार रस्ता, पश्‍चिम वळण रस्ता, चंदासिंग कॉर्नर, तरोडा नाका, गजानन मंदीर परिसर, कौठा परिसर, नमस्कार चौक रस्ता हे रस्ते असुरक्षीत.

ट्रक चालकाला लुटले, नांदेडची वाटचाल...
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : शहरापासून जवळच असलेल्या असर्जन नाका चौक परिसरात एका ट्रक चालकास मारहाण करून खंजर दाखवून त्याला लुटल्याची घटना समोर आली आहे. मात्र बहाद्दर चालकाने एका चोरट्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. विष्णुपूरी, असर्जन, काळेश्‍वर, विद्यापीठ परिसर, लातूर फाटा, शिवरोड, बोंढार रस्ता, पश्‍चिम वळण रस्ता, चंदासिंग कॉर्नर, तरोडा नाका, गजानन मंदीर परिसर, कौठा परिसर, नमस्कार चौक रस्ता हे रस्ते असुरक्षीत झाल्याने नेहमीच अशा घटना रस्त्यावर घडत आहेत. 

पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की उस्मानाबाद जिल्ह्यातील भाटसांगवी तालुका कळंब येथील अजय अण्णासाहेब गायकवाड (वय १९) हा आपल्या वडिलांसोबत आईचर (एमएच२५-०१२४) मध्ये बंगळूरु येथून एका कंपनीमधून जनरेटर पार्सल घेऊन पोहरादेवी जिल्हा वाशिम येथे देण्यासाठी जात होते. जाताना रात्रीची वेळ असल्याने त्यांना झोप येत होती. म्हणून त्यांनी आपले वाहन असर्जन नाका येथील चौकाच्या समोरील मुख्य रस्त्याच्या कडेला ता. ११ जूलैच्या रात्री उभे केले. तेथेच बापलेक आपल्या गाडीच्या केबिनमध्ये झोपले. 

हेही वाचानांदेडमध्ये जबरी चोऱ्या वाढल्या, काय आहे कारण...? वाचा

एका चोरट्याला पकडले

पहाटे तीनच्याच्या सुमारास त्यांच्याजवळ एका दुचाकीवरुन तीन चोरटे आले. त्यापैकी अभिषेक सचिन गायकवाड रा. सखोजीनगर याने कॅबीनधून अण्णासाहेब गायकवाड यांना उठविले. त्यांना जबरदस्तीने कॅबीनच्या खाली ओढून काढले. मारहाण करून खंजरचा धाक दाखवुन त्यांच्याजवळचा मोबाईल काढून घेऊन दुचाकीवरुन पळून जात होते. मात्र श्री. गायकवाड यांनी त्या तिघांपैकी अभिषक नावाच्या चोराला पकडले. मात्र शैलेंद्र नरेंद्रसिंग ठाकूर आणि गणेश भगवान साबळे हे दोघेजण दुचाकीवरून पसार झाले. 
हे तीघेही (एमएच -२६-६५५५) काळ्या रंगाच्या पॅशन प्रो दुचाकीवरुन आले होते. 

नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

त्यानंतर त्यांनी आरडा ओरडा केल्यानंतर त्यांचा मुलगा व काही आजूबाजूचे लोक जमा झाले. चोरट्यांची चंगलीच धुलाई करुन नांदेड ग्रामिण पोलिस घटनास्थळी आल्यानंतर त्यांच्या ताब्यात दिले. अजय अण्णासाहेब गायकवाड यांच्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात अभिषेक गायकवाड, शैलेंद्र ठाकूर आणि गणेश साबळे या तिघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तपास पोलीस नाईक श्री दीपके करत आहेत. या रस्त्यावर अनेक वेळा लुटमारीच्या घटना घडले असून पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी या भागातील नागरिक करत आहेत.