कोरोना ‘खाटां’ची खरी खोटी, विष्णुपुरी शासकीय रुग्णालयातील ४० खाटांचे गणित जुळेना

शिवचरण वावळे
Friday, 9 October 2020

सर्वप्रथम ‘सकाळ’ने शासकीय रुग्णालयातील रिक्त खाटांची अकडेवारी जाहीर करण्याविषयी बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाकडून नियमितपणे शहरातील सर्वात मोठ्या शासकीय रुग्णालयातील खाटांच्या स्थिती बद्दल माहिती देणे सुरु आहे.

नांदेड - जिल्हा आरोग्य विभागाकडून मागील आठवड्यापासून जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोरोनाच्या रिक्त खाटांची संख्या प्रसिद्ध करण्यात येत आहे. मात्र रिक्त खाटांची संख्या आणि प्रत्यक्ष उपचार सुरु असलेल्या कोरोना बाधित वार्डातील रुग्णांच्या खाटांची संख्या यात प्रचंड तफावत आढळुन येते. त्यामुळे कोरोनाच्या खाटांची नेमकी संख्या किती? याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. 

सर्व शासकीय रुग्णालय फुल्ल झाल्याच्या अफवेमुळे सामान्य जनता थेट खासगी रुग्णालयात धाव घेऊ लागले होते. रुग्णालयातील रिक्त खाटांची संख्या बद्दल कुठलिही माहिती उपलब्ध होत नव्हती, यासाठी सर्वप्रथम ‘सकाळ’ने शासकीय रुग्णालयातील रिक्त खाटांची अकडेवारी जाहीर करण्याविषयी बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाकडून नियमितपणे शहरातील सर्वात मोठ्या शासकीय रुग्णालयातील खाटांच्या स्थिती बद्दल माहिती देणे सुरु झाले आहे.

हेही वाचा- बालगृहातील मुलांना हवा भक्कम आधार ​

शासकीय रुग्णालयात कोरोनावर मोफत उपचार

नेहमीप्रमाणे शासकीय रुग्णालयास दुबळे समजुन खासगी रुग्णालयाची वाट धरणाऱ्या अनेकांवर बिल देण्याची वेळ आली, तेव्हा रुग्णालयच्या बिलाचा आकडा बघुन डोळे चक्रावल्याशिवाय राहत नाही. याउलट एकही रुपया खर्च न करता कोरोना सारख्या भयंकर आजारावर सहज मात केलेल्या रुग्णांचा अनुभव ऐकुन अनेकांना स्वतःच्या चुकीबद्दल पश्‍चाताप देखील होतो. 

जिल्हाभरात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ सुरु आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयात कोरोना आजारावर उपचारासोबतच उतम सुविधा मिळेल की नाही? याबद्दल जनतेच्या मनात शंकाहोती. कोरोना बाधितांना शहरातील खासगी कोविड सेंटरमध्ये लाखो रुपयाचा खर्च सोसावा लागत. प्रत्यक्षात खासगी रुग्णालयाप्रमाणेच शासकीय रुग्णालयात देखील उत्तम दर्जाची मोफत सुविधा आणि काळजी घेतली जाते ही वस्तूस्थिती आहे. 

हेही वाचले पाहिजे- जिल्ह्यासाठी लवकरच ४० हजार कोरोना किट मिळणार - जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर ​

४० खाटांची तफावत 

पंजाब भवन, यात्रीनिवास आणि महसूल भवन कोविड केअर सेंटर वगळता सुरुवातीस विष्णुपुरीच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात १७० आणि त्या नंतर ११० अशा एकुण २८० खाटा उपलब्ध आहेत. सध्या १८१ रुग्ण उपचार घेत आहेत. तर ५९ खाटा रिक्त असल्याचे सांगण्यात येत आहे. या रिक्त खाटा आणि प्रत्यक्ष उपलब्ध खाटांमध्ये ४० खाटांची तफावत दिसून येते.

अससल्याचे सांगण्यात येते  जिल्हा रुग्णालयात शंभर खाटा, नवीन इमारतीमध्ये ५० खाटा असे १५० च्या जवळपास खाटा तर आयुर्वेदिक रुग्णालयात ५० खाटा आहेत. प्रत्यक्षात गुरुवारी संध्याकाळपर्यंत १८१, श्रीगुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालयात ६१, नवीन इमारत ३९ व शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय- १८ असे २९९ कोरोना बाधित रुग्णावर उपचार सुरु आहेत. अर्थात सर्व रुग्णालयात मिळुन २९९ खाटावर रुग्ण आहेत. 

रुग्णसंख्या वाढल्यास खाटा वाढविणार
शासकीय रुग्णालयात पूर्वी शंभर दोनशे खाटा होत्या त्यानंतर वाढवून खाटांची संख्या २८० इतकी करण्यात आली आहे. रुग्ण वाढल्यास ही संख्या वाढविण्यात येईल. सध्या रुग्णसंख्या कमी असल्याने खाटा मर्यादित ठेवल्या आहेत.
अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The true and false of Corona beds did not match the mathematics of 40 beds in Vishnupuri Government Hospital Nanded News