नांदेड जिल्ह्यात दोन मुले, एक मुलीला पळवून नेले

गुन्हा
गुन्हा
Updated on

नांदेड : जिल्ह्यात (Nanded) तीन वेगवेगळ्या घटनेत दोन मुले आणि एका मुलीला पळवून नेल्याची घटना घडली असून याबाबत संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाडीपाटी (ता. नांदेड) येथील धनगरवाडी रस्त्यावरील लहुजी निराधार निराश्रीत बाल आश्रमातील सोनु तुकाराम वाघमारे (वय १६) हा सोमवारी (ता.२०) सकाळी झोपेतून उठून आश्रमाच्या बाहेर गेला. त्यानंतर कुणीतरी त्याला पळवून नेले. याबाबत बाल आश्रमाचे अधीक्षक राहुल लक्ष्मण सुर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामिण (Crime In Nanded) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार महेश कोरे करत आहेत.

गुन्हा
औरंगाबाद जिल्ह्यात अवैध दारू वाहतूक करणाऱ्यास पोलिसांनी पकडले


दुसऱ्या घटनेत किनवट शहरालगत असलेल्या गोकुंदातील सिद्धार्थनगर येथून विश्वास कोडिंबा पाटील (वय १७) या मुलाला सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कुणीतरी पळवून नेले आहे. याबाबत त्याची आई संगीता पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किनवट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक वाटोरे करत आहेत.
तिसऱ्या घटनेत चिंचगव्हाण (ता. हदगाव) येथून शिवानी मारोती क्षीरसागर (वय १६) ही मुलगी ता. १३ डिसेंबर २०२० रोजी रात्री बारा वाजता कोणालाही काहीही न सांगता निघून गेली आहे. ती बेपत्ता असल्याची तक्रार मुलीच्या पालकांनी मनाठा पोलिस ठाण्यात केली आहे. या मुलीची माहिती मिळाल्यास व्ही. एल. चव्हाण, टी. वाय. चिटेवार किंवा मनाठा पोलिस ठाणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस ठाण्यातर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nanded
Turning Grief into Determination: Abhimanyu Cracks MPSC Revenue Assistant Exam
Police Raid Grocery Store, Trace Larger Gutkha Stock Worth Lakhs in Nanded City
Mother’s hard work and son's determination lead to PSI success
Marathi News Esakal
www.esakal.com