
देगलूर : रक्ताच्या नात्यापेक्षा कधी-कधी मैत्रीचे नाते श्रेष्ठ ठरते. एकमेकांच्या सुख-दुःखात वाटेकरी होत अनेक जण आपली मैत्री जीवनभर जपतात. तालुक्यातील तमलूर येथील दोन बालमित्रांतील पहिलीपासून सुरू झालेला शिक्षणातील प्रवास अखेर दोन मित्रांचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या महसूल सहायक पदाच्या निवडीपर्यंत येऊन थांबला.